स्वप्नांची नगरी आपल्या देशाची राजधानी मुंबई सध्या नशेखोरांच्या हातात गेलीये. होय.. तुम्ही जे ऐकताय त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर आम्ही तु्म्हाला आता जी दृष्य दाखवणार आहोत ती बघा...
हा तडफडणारा मुलगा बघा.. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहा, त्याच्या मृत्यूच्या अगदी काही क्षणापुर्वीचा त्याचा एक नशेच्या ओव्हरडोस झालेला फोटो देखिल नीट निरखून पाहा, त्याला धड उभं राहता येत नव्हतं.. त्याला एकानं पकडून उभं केलं तेव्हा त्याची जीभ बाहेर येत होती आणि त्यानं डोळे अक्षरश पांढरे केले.. त्याच्या मृत्यूचा हा अंगावर काटा आणणारा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. नशेच्या विळ्यख्यात अडकलेल्या या तरुणाला शेवटी आपल्या प्राणाला मुकावं लागलंय... पण त्या आधी या मालाडच्या एका शौचालयात हा ड्रग्सचा खेळ कसा सुरु होता. हे तरुण कसे एकमेंकांना पकडून पकडून हे नशेचं विष देत होते ते पाहा,
मालाड पूर्वतील अप्पा पाडा परिसरात असणाऱ्या मैदानातील एका शौचालयात ही ड्रग्स पार्टी खुल्लमखुल्ला सुरु होती. एकानं या मुलांच्या डर्टी ड्रग्स पार्टीचा हा धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला. यादृष्यांमध्ये स्पष्ट दिसतंय. नशेचं इंजेक्शन भरून ते थेट एका मुलाला कसं देण्यात आलं. अगदी सराईत डॉक्टरला लाजवतील असं नशेचं इंजेक्शन नशेखोरांना टोचण्यात आलंय. याच डर्टी ड्रग्स पार्टीनंतर यापैकी एका नशेखोराचा दयनीय अंत झाला.
ड्रग्ज ओव्हरडोजमुळे झालेले मृत्यू हे स्वतंत्र रित्या नोंदवले जात नाहीत. पोस्टमार्टममध्ये हृदयविकाराचा झटक्यानं किंवा मल्टी ऑरगन फेल्यूअर असंच कारण नोंदवलं जातं. त्यामुळे किती लोकांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसनं मृत्यू होतो याची आकडेवारी समोर येत नाही. पण गेल्या सहा महिन्यात
मुंबईला ड्रग्जचा विळखा
जानेवारी 2026 ते जून 2026
206.38 कोटींचे ड्रग्स जप्त
428.45 किलो गांजा
45.64 किलो एमडी
12.63 किलो चरस
2.77 किलो हेरॉईन
२०६.३८ कोटींपेक्षा जास्त मूल्याचं ड्रग्स जप्त करण्यात आलं त्यामध्ये ४२८.४५ किग्रॅ गांजा, ४५.६४ किग्रॅ एमडी, १२.६३ किग्रॅ चरस, २.७७ किग्रॅ हेरोईनचा समावेश आहे पोलिसांनी या 4012 गुन्हे या ड्रग्स पेडलर आणि सेवन करणाऱ्यांवर दाखल केले तर 3787 लोकांना अटक झाली.
गेल्या ६ महिन्यात हजारो गुन्हे दाखल होऊन हजारो लोकांना अटक होऊनही पोलिसांना मुंबईला पडलेला ड्रग्सचा विळखा पोलिसांना सोडता आलेला नाही. ६ महिन्यातच नेस्को ड्रग्स पार्टीतील दोघांच्या मृत्यूनंतर मालाडमधील या ड्रग्सपार्टीत एकाचा मृत्यू झालाय. पोलिसांचे कारवाईचे आकडे जरी मोठे दिसत असले तरी अद्याप नशेखोरीवर आणि ड्रग्स तस्करीवर नियंत्रण पोलिसांना मिळवता आलेलं नाही. त्यामुळे आता मुंबईतल्या तरुणाईला नशेत बुडवणारा हा धोका आपल्या घरापर्यंत येण्याआधी प्रत्येक पालकानं सावध आणि सजग राहण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.