Dam Water Level: मान्सून परतला अन् मुंबईकरांची धाकधूक वाढली! ७ तलावातील पाणी पातळी घटली; पाहा ताजी आकडेवारी

Mumbai Dam Water Level Update: मान्सूनच्या माघारीनंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्याची पातळी घटत आहे. मोडक सागरमध्ये ७० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे.
Mumbai Water Crisis: मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार, सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; किती टक्के पाणीसाठा शिल्लक?
Mumbai Dam Water LevelSaam TV
Published On: 

Mumbai seven lakes water level latest update : राज्यातून मान्सूनने माघार घेतली असून यंदा अनेक भागांत पावसाची मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. एकीकडे संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले असताना आता दुसरीकडे मुंबईकरांची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांपैकी 'मोडक सागर' तलावातील पाणी पातळीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. चिंतेची बाब म्हणजे 'मोडक सागर' या मोठ्या धरणातील पाणी पातळी इतर तलावांच्या तुलनेत अतिशय वेगाने खाली आल्याचे समोर आले आहे.

मान्सून संपल्यानंतर आता उन्हाळ्याच्या दिवसांत मुंबईला पाणी कमी पडणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिकेकडून दररोज सर्व धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केली जात असून, सध्याच्या घटत्या पाणी पातळीमुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी सर्वात कमी झाली आहे. जुलै महिन्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी सध्या त्यात फक्त ७० टक्के पाणी शिल्लक आहे.

मुंबई महापालिकेच्या हायड्रोलिक इंजिनिअरिंग विभागाकडून दररोज सर्व ७ धरणांतील साठ्याची मोजणी केली जाते. मान्सून माघारी परतल्यामुळे तलावांमध्ये नवीन पाण्याची आवक पूर्णपणे थांबली आहे. त्यातच ऑक्टोबरमधील कडक ऊन आणि वाढलेल्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. दैनंदिन वापरामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

Mumbai Water Crisis: मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार, सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; किती टक्के पाणीसाठा शिल्लक?
Congress : काँग्रेसला मोठा धक्का बसणार? माजी मुख्यमंत्री पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत, समोर आली मोठी अपडेट

मुंबईत सध्या कोणतीही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली नाही, असे स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिले आहे. तसेच, शहरातील पाणीकपात मागे घ्यायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासन कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. स्विमिंग पूल तसेच इतर व्यावसायिक आणि बिगर-अत्यावश्यक कामांसाठी होणाऱ्या पाण्याच्या वापरावर लवकरच निर्बंध लादण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.

Mumbai Water Crisis: मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार, सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; किती टक्के पाणीसाठा शिल्लक?
BJP MP Accident : मोठी बातमी! भाजप खासदाराच्या कारने २ जणांना उडवले, भंडाऱ्यात भीषण अपघात

मुंबईला मोठ्या प्रमाणावर पाणी देणाऱ्या मोडक सागर धरणातील पाणी पातळी इतर ६ तलावांपेक्षा जास्त घटली आहे. अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, विहार, तुळशी आणि मध्य वैतरणा या उर्वरित धरणांमध्येही पाण्याचा वापर आणि बाष्पीभवन यामुळे साठा हळूहळू कमी होत आहे. सध्या धरणांतील घटत्या साठ्यावर मुंबई महापालिका प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. आगामी काळात किंवा उन्हाळ्यात पाण्याचे भीषण संकट उभे राहू नये, यासाठी पालिका अधिकारी सातत्याने आढावा घेत आहेत.

मुंबई शहराला आणि उपनगरांना रोज सुमारे ३,९०० दशलक्ष लिटर (MLD) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा वर्षभर अविरत सुरू ठेवण्यासाठी सातही तलावांमध्ये वर्षअखेर किंवा मान्सून संपताना पुरेसा जलसाठा असणे गरजेचे असते. जर पावसाळ्यात तलाव १००% भरले नाहीत किंवा मान्सूननंतर साठा वेगाने घटला, तर उन्हाळ्यात मुंबई महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागतो.

सहा धरणांमधील पाण्याची पातळी:

मोडकसागर - ७०%

अप्पर वैतरणा: ९७%

तानसा: ९२.५८%

मध्य वैतरणा: ९९.७४%

भातसा: ९७%

विहार: १००%

तुळसी: ९७.४०%

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com