मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर आता कमी झाला आहे. पाऊस जरी कमी झाला असला तरी गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. या धरणांमध्ये आतापर्यंत जमा झालेला पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या सातही धरणांमध्ये आज किती पाणीसाठा शिल्लक आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
मुंबई महानगर पालिकेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९६ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. १ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,०१,६४९ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९६.८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १३,११,२३८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ९०.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा ६ टक्क्यांनी वाढला आहे.
मुंबई शहर आणि उपनगराला ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव यांचा समावेश आहे. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.
- अप्पर वैतरणा - ९६.८१ टक्के पाणीसाठा
- मोडक सागर - ९९.५४ टक्के पाणीसाठा.
- तानसा - ९८.२९ टक्के पाणीसाठा.
- मध्य वैतरणा - ९८.८६ टक्के पाणीसाठा
- भातसा - ९५.३७ टक्के पाणीसाठा.
- विहार - १०० टक्के पाणीसाठा.
- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.