CSMT Block
CSMT BlockSaam tv

CSMT Block : महत्त्वाची बातमी! सीएसएमटी स्थानकावर ८५ दिवसांचा ब्लॉक; दादरपर्यंतच धावणार अनेक एक्सप्रेस

CSMT Station Block for 85 Days: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएसएमटी स्थानकावर फलाट क्रमांक १६ आणि १७ वर ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.
Published on
Summary

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

सीएसएमटी स्थानकावर ८५ दिवसांचा ब्लॉक

फलाट क्रमांक १६ आणि १७ वर ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जवळपास ८५ दिवसांचा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पुनर्विकास कामांसाठी फलाट क्रमांक १६ आणि १७ वर ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

CSMT Block
Western Railway : मुंबईकरांना दिलासा! विरार लोकल आणखी सुसाट धावणार, पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं काम पूर्ण, वाचा

सीएसएमटी स्थानकावर फलाटाच्या पूनर्विकास कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधी सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक बदलणार आहे. अनेक ट्रेन या सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना खूप त्रास होणार आहे.

रेल अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीकडून सीएसएमटी स्थानकाचा पूनर्विकास होणार हे. यामध्ये फलाटांवरील पायाभूत सुविधा मजबूत करणे, ओव्हरहेड वायरची कामे तसेच सुरक्षेसंबंधित कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी फलाट क्रमांक १६ आणि १७ बंद ठेवण्यात येणार आहे.

सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १६ आणि १७ बंद असणार आहे. या फलाटावरुन अमरावती, अकोला, नागपूर, भुसावळ, जळगाव, नांदेड, लातूर या ठिकाणी गाड्या जातात. आता या गाड्या दादर स्थानकावरच थांबणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे बदल होणार आहेत.

CSMT Block
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

१ फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत संबंधित गाड्या सीएसएमटीऐवजी दादरला थांबणार आहे. यामुळे प्रवाशांना अंतिम स्थानक दादरला उतरावे लागणार आहे. दरम्यान, ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरु-सीएसएमटी एक्सप्रेस गाडी ठाणे स्थानकांपर्यंत धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

CSMT Block
Sunday Mega Block : विकेंडला घराबाहेर फिरायला जात असाल तर थांबा; 'या' मार्गावर रविवारी असणार मेगा ब्लॉक, वाचा वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com