CSMT Station : सीएसएमटी रेल्वे स्थानकातून 40 लाख रुपयांची रोकड जप्त; परिसरात खळबळ

40 Lakh Cash Seized : नागपूर मुंबई दुरांतो एक्सप्रेसमधून लाखो रुपयांची रोकड जप्तची कारवाई झालीये. जीआरपी आणि आरपीएफसीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
40 Lakh Cash Seized
CSMT StationSaam TV
Published On

सचिन गाड, मुंबई

सीएसएमटी रेल्वे स्थानकातून 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नागपूर मुंबई दुरांतो एक्सप्रेसमधून लाखो रुपयांची रोकड जप्तची कारवाई झालीये. जीआरपी आणि आरपीएफसीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

कपड्याचे पार्सल पाठवण्याच्या नावाखाली रोकड पाठवण्यात आली होती. आरपीएफला याबाबात गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सदर कारवाई करण्यात आली आहे. रोकड जप्त केल्यानंतर जीआरपीने आयकर विभागाला ही माहिती दिलीये.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. यामध्ये पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापेमारी आणि वाहनांची तपासणी सुरू आहे. आजही सीएसएमटी रेल्वे स्थानकात एका कपड्यांच्या बॅगमधून पैसे नेत असल्याची टीप आरपीएफ जवानांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सदर घटना उघडकीस आली आहे.

40 Lakh Cash Seized
Old Pune Mumbai Highway: बुधवापर्यंत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण

गडचिरोलीत 11 लाखांची रोकड जप्त

गडचिरोलीमध्ये 2 दिवसांपूर्वीच 11 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. गडचिरोलीत नाकाबंदी असताना दोन वेगवेगळ्या वाहनातून ही रोकड नेली जात होती. पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी ही रोकड जप्त करत याचा अधिकृत स्त्रोत काय आहे याची माहिती संबंधित कार चालकाकडे मागितली.

40 Lakh Cash Seized
Weather Forecast: राज्यात तापमानाचा पारा वाढणार, विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस कोसळणार; वाचा वेदर रिपोर्ट

नागपूरमध्ये १० लाखांची रोकड जप्त

नागपूरमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने एकूण 10 लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता असलेल्या काळात एखाद्या व्यक्तीकला 50 हजारांहून अधिक रोख रक्कम स्वतःकडे बाळगता येत नाही. असे असूनही मुंबई, नागपूर, यवतमाळ आणि अन्य जिल्ह्यांमध्ये पोलिसांकडून अशापद्धतीने रोकड जप्तची कारवाई झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com