Mumbai Crime: हॉटेलमध्ये बोलावून घेतलं, चर्चेच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार, अमेरिकेत PHD करणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य

Mumbai Police: मुंबईतल्या वांद्रे येथील एका आलिशान हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या तरुणाने हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime: हॉटेलमध्ये बोलावून घेतलं, चर्चेच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार, अमेरिकेत PHD करणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य
Mumbai CrimeSaam Tv
Published On

लग्नाचे आमिष दाखवत मुंबईत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात या प्रकरणी तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय आरोपी तरुण अमेरिकेमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत आहे. पीडित तरुणी या तरुणासोबत शिक्षण घेते. तरुण आणि तरुणीची आधी ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर तिला हॉटेलवर नेत तिच्यावर बलात्कार केला. जर कुणाला सांगितले तर तुझा जीव घेईल अशी देखील धमकी आरोपीने तरुणीला दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसर्च करणाऱ्या तरुणाने तरुणीला अभ्यासासाठी एका हॉटेलवर बोलावले होते. तरुणाने सांगितल्याप्रमाणे ती तिथे गेली. त्यानंतर त्याने तिच्यासोबत बलात्कार केला. ही घटना वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये घडली. आरोपी लोअर परेलमध्ये राहतो आणि पीडिता माहिममध्ये राहते. आरोपीचे वडील एका खासगी बँकेत वरिष्ठ पदावर नोकरी करतात. पीडितेने या घटनेनंतर वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

Mumbai Crime: हॉटेलमध्ये बोलावून घेतलं, चर्चेच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार, अमेरिकेत PHD करणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य
Nanded Crime : यात्रेकरू चहा पिण्यासाठी हॉटेलवर थांबताच चोरट्याने साधला डाव; दागिन्यांसह रोख रक्कम असलेली पर्स घेऊन पसार

तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी ते १२ जून दरम्यान वांद्रे येथील एका आलिशान हॉटेलमध्ये आणि अमेरिकेमध्ये राहत असताना तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. आरोपी तरुण अमेरिकेतील एका विद्यापीठामध्ये पीएचडीचे शिक्षण घेत आहे. तो पीडितेला एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत भेटला. पहिल्या भेटीनंतर ते पुन्हा भेटले. त्यांची मैत्री वाढत असताना त्याने तिला शिक्षणात मदत करतो असे सांगितले. त्यासाठी त्याने तिला वांद्रे येथील एका आलिशान हॉटेलवर बोलावले आणि तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.

Mumbai Crime: हॉटेलमध्ये बोलावून घेतलं, चर्चेच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार, अमेरिकेत PHD करणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य
Crime: शाळा सुटल्यावर एकटीला गाठायचा, सोबत नेऊन...; ३ वर्षांच्या चिमुकलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार

पीडितेने असा देखील आरोप केला आहे की, पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या आरोपीने अमेरिकेत एकत्र राहत असतानाही तिचे लैंगिक शोषण केले होते. काही दिवसांनी पीडितेला कळले की आरोपी इतर महिलांशीही त्याच्या लग्नाबद्दल बोलत आहे. जेव्हा तिने याबद्दल आरोपीला जाब विचारला तर त्याने तिच्यावर हल्ला केला आणि गैरवर्तन केले. त्याने तिचे खासगी फोटो लीक करण्याची आणि तिला मारून टाकण्याची धमकीही दिली. यामुळे कंटाळून पीडितेने तिच्या आईला संपूर्ण कहाणी सांगितली आणि त्यानंतर आई-मुलीने वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Mumbai Crime: हॉटेलमध्ये बोलावून घेतलं, चर्चेच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार, अमेरिकेत PHD करणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य
Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com