Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam tv

Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईत तीन महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न; काळाचौकी परिसरात खळबळ

मुंबईतील तीन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या तीन महिलांनी गुरुवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सचिन गाड

Mumbai Crime News: मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील तीन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या तीन महिलांनी गुरुवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईच्या अभ्युदय नगर, काळाचौकी परिसरातील तीन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai) अभ्युदय नगर, काळाचौकी परिसरातील तीन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी या महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Mumbai Crime News
Pune Police Bharti : मोठी बातमी! पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित; काय आहे कारण?

फिनेल आणि किटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बिल्डरच्या जाचाला कंटाळून या तीन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिल्डर घर रिकामे करण्यास दबाव टाकत असल्याचा आरोप या महिलांकडून करण्यात येत आहे.

Mumbai Crime News
Leopard Attack : जवळच उभा होता बिबट्या, कुत्रा असल्याचा झाला भास; नशीब बलवत्तर म्हणूनच मायलेकी वाचल्या

काळाचौकी परिसरात या तीन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. .या घटनेनंतर या महिलांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी महिलांना तातडीने रुग्णालयात नेले. या महिलांना मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णलायातील डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या महिलांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या घटनेने काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com