Pune Police Bharti : मोठी बातमी! पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित; काय आहे कारण?

पुणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
Pune Police Bharti News
Pune Police Bharti News Saam TV

Pune Police Bharti News : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

Pune Police Bharti News
Pune Crime : पुण्यात चाललंय काय? दोन दिवसांत ६ महिलांच्या गंभीर तक्रारी, पोलिसांत गुन्हे दाखल

३ जानेवारीपासून पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू असून भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.

अशातच, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुण्यातील (Pune News) पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

Pune Police Bharti News
Leopard Attack : जवळच उभा होता बिबट्या, कुत्रा असल्याचा झाला भास; नशीब बलवत्तर म्हणूनच मायलेकी वाचल्या

पुणे पोलीस (Pune Police) मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे, असं उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com