Mumbai Crime News: दीड वर्षापासून पसार घरफोड्या गजाआड; अखेर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime News: दिपक उर्फ निखील रामगोपाल वैश्य (३८ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घरफोड्या हा विविध गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार होता
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv
Published On

संजय गडदे

Mumbai Crime News:

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दिवसा घरफोडी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचदरम्यान अशाच एका घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दिपक उर्फ निखील रामगोपाल वैश्य (३८ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घरफोड्या हा विविध गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार होता. (Latest Marathi News)

मुंबई परिसरत घरफोड्या करणारा चोरटा गेल्या दीड वर्षांपासून फरार होता. या घरफोड्याला एमआयडीसी पोलिसांनी अंधेरी परिसरातून सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एकूण 13 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याशिवाय आरोपीकडून 44 तोळे वजनाचे सोने, 4 मोबाईल असा एकूण 22 लाख 59 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Mumbai Crime News
Bihar Crime News: सख्खा भाऊ पक्का वैरी! संशयावरून १५ वर्षीय बहिणीची निर्घृण हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेला महाकाली केव्हज रोड वरील लक्ष्मी वेल्फेअर सोसायटीतील घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण २,३८,०००/- रूपये किमतीचा ऐवज चोरी केला.

त्यानंतर घरात राहणाऱ्या तक्रारदार शशिकला रमेश मोरे यांनी चोरी केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. या फियर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम ३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल केला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो उ नि यश पालवे आणि त्यांच्या पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यावेळी आरोपी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून समजली. पुढे पोलिसांनी खातरजमा करून त्याला अंधेरी स्थानक परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले.

Mumbai Crime News
Panjab Crime News: शिक्षक झाला हैवान! विद्यार्थ्यांला कार बोनेटवर लटकवून केलं भयंकर कृत्य; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने गुन्ह्यातील सहभाग कबूल केला. याशिवाय इतरही तेरा गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली.

आरोपी दिवसा दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान करायचा. घरफोड्या हा ज्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा बैठ्या चाळी किंवा झोपडपट्टी परिसरात चोरी करत असल्याचे त्याने कबूल केले. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीकडून एकूण 13 गुन्ह्यांची उकल करून 44 तोळे वजनाचे सोने, 4 मोबाईल असा एकूण 22 लाख 59 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सध्या आरोपी हा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस आता त्याने आणखी घरफोडी किंवा इतर गुन्हे केले आहेत का, यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com