Mumbai Crime: आई-वडिलांकडून नवजात बाळाच्या अपहरणाची तक्रार; तपासात धक्कादायक माहिती उघड, पोलिसही चक्रावले

Mumbai Crime News: जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या 2 दिवसाच्या नवजात बाळाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली होती.
Mumbai Crime News Parents abandoned a 2-day-old baby in a rickshaw
Mumbai Crime News Parents abandoned a 2-day-old baby in a rickshawSaam TV

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News: मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या 2 दिवसाच्या नवजात बाळाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपास सुरू केला. अशातच तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसही चक्रावले.

मिळालेल्या माहितीनुसार , 2 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास जुह गल्ली परिसरात राहणारे इमरान सैनूर खान (वय 28) त्याची पत्नी रहनुमा इमरान खान (वय25) या दाम्पत्याने आपल्या दोन दिवसाच्या बालकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली.

Mumbai Crime News Parents abandoned a 2-day-old baby in a rickshaw
Sambhajinagar News: 'मम्मी पप्पा सॉरी मला डोकेदुखी असह्य झाल्याने मी...', तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

तक्रार प्राप्त होताच जुहू पोलिसांनी बाळाचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी इमरानच्या घराशेजारी राहणाऱ्या नागरिकांची देखील चौकशी केली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी या दाम्पत्याला बाळ झालं होतं, असं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे नवजात बाळाचे अपहरण नेमके कुणी केले असेल? असा प्रश्न पोलिसांना पडला होता.

दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनि गणेश जैन पोलिस उपनिरीक्षक सीमा फरांदे, पोलिस हवालदार पाटील, पोलिस हवालदार खोमणे, पोलिस शिपाई कणमुसे, पोलिस शिपाई पन्हाळे या तपास पथकाने बाळाच्या आई-वडिलांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

Mumbai Crime News Parents abandoned a 2-day-old baby in a rickshaw
Nagpur Crime News: वर्दळीच्या रस्त्यावरून 1 कोटी 25 लाखांची लूट, भर बाजारात घडला थरार; घटनेचा VIDEO समोर

त्यानंतर समोर जे सत्य आलं, ते ऐकून पोलिसही चक्रावले. जन्मदात्यांनीच आपल्या नवजात बालकाला सांताक्रुज पश्चिम येथील खिरानगर परिसरात पार्क केलेल्या रिक्षामध्ये सोडून दिल्याचे कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सांताक्रुज पोलिसांना संपर्क साधला असता 30 जुलै रोजी ऑटोरिक्षामध्ये नवजात अर्भक सापडले असल्याचे समजले.

यासंदर्भात सांताक्रुज पोलीस ठाणे येथे कलम 317 भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे.यानंतर जुहू पोलिसांनी इमरान खान व रहनुमा खान यांना सांताक्रुज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जन्मदात्या आई-वडिलांनीच दोन दिवसांच्या बाळाला रिक्षामध्ये सोडून दिल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com