Dombivli Crime News: विनयभंगाचा गुन्हा दाखल केला म्हणून भाजप पदाधिकाऱ्याची महिलेला जीवे मारण्याची धमकी!

Dombivli Crime News : आपल्याला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी देखील या महिलेने पोलिसांकडे केली आहे.
Dombivli Crime News
Dombivli Crime Newssaam tv
Published On

>>अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Dombivli Latest News Updates: भाजपाच्या डोंबिवली पूर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल करणाऱ्या पीडित महिलेने आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

पीडित महिला भाजपाच्या ग्रामीण मंडळाची पदाधिकारी आहे. या महिलेने गुरूवारी पोलिस ठाण्यासमोरच प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. यावेळी तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आपल्या जीवाला आरोपीकडून धोका निर्माण झाला असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी देखील या महिलेने पोलिसांकडे केली आहे.

Dombivli Crime News
Mumbai News: पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज! आपत्तींचा सामना करण्यासाठी बीएमसीचा 'मेगा प्लान'

पीडितेने सांगितलेकी, आरोपी नंदू जोशी शरीरसुखाची मागणी करत असल्याची तक्रार डोंबिवलीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्या-पदाधिकाऱ्यांकडे करूनही मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी त्याचा हा त्रास सहन करत आहे. अखेर माझी सहनशीलता संपली आणि मी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकणी गुन्हाही दाखल झाला आहे. सात ते आठ दिवस झाले तरी अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही असे पीडित महिलेने सांगितले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होताच तुला जीवे ठार मारणार अशी धमकी आरोपीने दिली असल्याचा आरोप पीडितेने केलाय. त्याच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे, त्यामुळे त्याला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे असे पीडित महिलेने पत्रकारांना सांगितले. ही महिला या संदर्भात तक्रार देण्यासाठी गुरूवारी रात्री मानपाडा पोलिस ठाण्यात आली होती. (Breaking News)

Dombivli Crime News
Cordelia Cruise Case: बहुचर्चित कॉर्डेलिया क्रुझवर आले होते एनसीबीनेच जप्त केलेले अमली पदार्थ? हायकोर्टात याचिका दाखल

डोंबिवली पूर्व भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढत पोलिसांनी हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची भाजपने केली आहे. या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून याच मुद्द्यावरून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करणार नसल्याचा ठराव देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. (Latest Political News)

आज संध्याकाळी पीडितेने गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदू जोशी धमकावत असल्याचा आरोप केला आहे. मानपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची दोन दिवसात बदली करतो, त्यानंतर तुला मारतो अशी धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. नंदू जोशी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडीतेने केली आहे. तसेच धमकी दिल्या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात असल्याचे पीडितेने सांगितले. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com