Kalyan Crime News: पोलीस आणि चोरट्यामध्ये रंगला फिल्मी स्टाईल थरार! 30 हून अधिक गुन्हे असलेला इराणी आरोपी अटकेत

परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे पोलिसांनी या आरोपीची ओळख पटवली.
Kalyan Crime
Kalyan CrimeSaamtv
Published On: 

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी...

Kalyan Crime News: मोबाईल स्विचिंग व चेंज सारखे तब्बल 30 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या इराणी चोरट्याला मीरा भाईंदर युनिट व कल्याण खडकपाडा पोलिसांच्या पथकाने आंबिवली येथून बेड्या ठोकल्या आहेत.

अलिहसन आबु इराणी असे चोरट्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस आल्याच्या माहिती मिळताच अलीहसनने घराच्या खिडकीतून पळ काढला होता. ज्यानंतर फिल्मी स्टाईल पाठलाग करत त्याला अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

Kalyan Crime
Satara News: सोशल मीडियावर स्वत:ला श्रद्धांजली वाहून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल;परिसरात खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या मीरा भाईंदर (Meera Bhayandar) परिसरात गेल्या आठ दिवसात सहा ते सात ठिकाणी चैन स्नॅचिंगची घटना घडल्या होत्या. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज व बातमीदार यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या आरोपीची ओळख पटवली. अलिहसन आबु इराणी असे या चोरट्याचे नाव असून तो कल्याणमधील आंबिवली इराणी वसती परिसरात राहणारा असल्याची समोर आली.

या माहितीनुसार मिरा भाईंदरचे पोलीस युनिट व कल्याण खडकपाडा पोलिसांचे पथक अलीहसन च्या शोधासाठी तैनात करण्यात आले. आंबिवली परिसरातील मधील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घराबाहेर सापळा रचण्यास सुरुवात केली. या दरम्यान आरोपी अलिहसन इराणी याला पोलीस आल्याची कुणकुण लागल्याने त्याने घरातील खिडकीतून उडी मारून घराच्या काही अंतरावर असलेल्या जंगलामध्ये पळ काढला.

Kalyan Crime
Wardha Accident News : वेगवान कार झाडावर आदळली; जीवलग मित्रांनी गमावला जीव

मात्र घराच्या चारी बाजूला उभे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पथकाला माहिती देत त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र या चोरट्याने त्याला चकवा देण्यासाठी झाडाझुडपात असलेल्या चिखलात झोपला. यावेळी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या एपीआय गायकवाड व त्यांच्या स्टाफने तात्काळ चिखलात धाव घेत अलीहसनला चिखलातच पकडले.

अली हसन इराणी याच्या विरोधात अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली सध्या मीरा-भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मीरा-भाईंदर पोलीस करत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.