Mumbai Crime: 'आजी खूप दुखतंय', ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत नेमकं काय घडलं?

Goregaon Crime News: मुंबईमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर रडत होती. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.
Mumbai Crime: 'आजी खूप दुखतंय', ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत नेमकं काय घडलं?
Mumbai Goregaon Crime NewsSaam TV
Published On

मुंबईमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगावच्या एका नामांकित शाळेमध्ये ही मुलगी शिक्षण घेते. या प्रकरणी पीडित मुलीच्या शाळेमधील केअर टेकर महिलेला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला तिची आजी शाळेमध्ये सोडण्यासाठी गेली होती. शाळा सुटल्यानंतर आजी परत तिला आणण्यासाठी गेली. घरी आल्यानंतर कपडे बदलत असताना आजीला मुलीच्या अंगावर काही जखमा दिसून आल्या. तसंच मुलगी सतत त्रास होतोय असं म्हणत होती. त्यामुळे तिची आजी खूपच घाबरली. मुलीसोबत काही तरी भयंकर घडलं असल्याचा अंदाज तिच्या आजीला आला.

Mumbai Crime: 'आजी खूप दुखतंय', ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत नेमकं काय घडलं?
Crime: मध्यरात्री रक्तरंजित थरार! लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या, मैत्रिणीवरही चाकूने सपासप वार

पीडित मुलीच्या आजीने तिच्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी पीडित मुलीला तात्काळ रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी करून मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी थेट गोरेगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Mumbai Crime: 'आजी खूप दुखतंय', ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत नेमकं काय घडलं?
Kej Crime : केज गटशिक्षणाधिकारी विरोधात विनयभंगाचा गुन्हा; अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी तपास करून शाळेत काम करणाऱ्या एका ४३ वर्षीय केअर टेकर महिलेला अटक केली. या महिलेची सध्या चौकशी सुरू आहे. तिने या मुलीसोबत नेमकं काय केलं? यामध्ये तिचा काय सहभाग आहे? याचा तपास पोलिस करत आहेत. या महिला कर्मचारीची नेमकी भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शाळेतील आणखी तीन महिला कर्मचाऱ्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.

Mumbai Crime: 'आजी खूप दुखतंय', ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत नेमकं काय घडलं?
Beed Crime News : "आज माझा वाढ‌दिवस, मुळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही" बीडमध्ये तरुण व्यवसायिकावर जीवघेणा हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com