Girl Stuck In Classroom: शाळेमध्ये वर्गात मुलगी अडकली, बाहेरून लॉक, खिडकीतून आरडाओरड करताना घडलं भयंकर

Girl Stuck In Classroom: ओडिशातील केओंझार येथे दुसरीत शिकणारी मुलगी शाळेतच रात्रभर अडकली. सकाळी सुटका झाल्यावर तिची तब्येत बिघडली होती. या घटनेमुळे शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Girl Stuck In Classroom
Girl Stuck In ClassroomSaam Tv
Published On

ओडीशाच्या केओंझार येथील सरकारी शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत दुसरीच्या वर्गाच्या शिकणारी एक मुलगी शाळा सुटल्यानंतर देखील शाळेतच अडकून राहिली. शाळा सुटल्यानंतर सर्व मुले घरी गेल्यानंतर ही मुलगी वर्गातच राहिली. रात्रभर एका बंद खोलीत राहल्यानंतर मुलीची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. मुलगी घाबरलेली होती. तिने अनेकदा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र दार बंद असल्याने ती काही करू शकली नाही. सकाळी जेव्हा शाळेतील कर्मचाऱ्यांनी वर्गाचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना मुलगी ज्या अवस्थेत दिसली ते पाहून सर्वच घाबरले.

Girl Stuck In Classroom
Viral Video: बाईई काय हा प्रकार! लॅपटॉपवर बनवल्या पुऱ्या, महिलेचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सरकारी शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणारी मुलगी चुकून वर्गातच राहिली. रात्रभर बंद खोलीत राहल्यानंतर सकाळी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा मुलीची बिघडलेली दिसली. ओडीशाच्या केओंझार येथील बंसपाल ब्लॉकमधील सरकारी शाळेतील ही घटना घडली आहे. दुसरीच्या वर्गात शिकणारी ज्योत्स्ना दुहेरी ही वर्गात झोपली होती. दरम्यान सर्व शाळा सुटल्यानंतर ही मुलगी वर्गातच राहिली.

Girl Stuck In Classroom
Viral Video: भर मिरवणुकीत बैलाने ठोकली धूम, सगळीकडे उडाला गोंधळ अन् ग्रामस्थांची धावपळ, नेमकं काय घडलं?

गुरूवारी ज्योत्स्ना शाळेतून घरी आली नसल्याने कुटुंबियांनी देखील विचारपूस केली. दरम्यान रात्रभर शोधाशोध केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळेत जाऊन तपासले असता मुलगी शाळेच्या वर्गातच दिसली. मात्र यावेळी मुलीची तब्येत बिघडली होते. रात्रभर शाळेत एकटं राहिल्यानंतर मुलगी फारच घाबरून गेली होती, तिने अनेकदा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा बंद असल्याने तिने ग्रीलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि तिचे डोके ग्रीलमध्ये अडकले. सकाळी हा सर्व प्रकार पाहून कुटुंबियांना देखील वाईट वाटले त्यांनी तात्काळ मुलीची सुटका करून तिला रूग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com