दारू पिऊन लोकलमध्ये चढला, पोलिसाचं महिला प्रवाशांसोबत घाणेरडं कृत्य; अश्लील इशारे करत अंगाला स्पर्श

Drunk Constable Arrested for Harassing Women: मद्यधुंद हवालदार महिला डब्यात चढून अश्लील वर्तन करत असल्याची घटना. महिलांना स्पर्श व मोबाईल हिसकावल्याचा गंभीर आरोप.
Drunk Constable Arrested for Harassing Women
Drunk Constable Arrested for Harassing WomenSaam Tv News
Published On
Summary
  • मद्यधुंद हवालदार महिला डब्यात चढून अश्लील वर्तन करत असल्याची घटना.

  • महिलांना स्पर्श व मोबाईल हिसकावल्याचा गंभीर आरोप.

  • नायगाव स्थानकावर महिलांनी त्याला उतरवून पोलिसांकडे दिलं.

  • आरोपी विरार पोलिस आयुक्तालयात तैनात असून, गुन्हा दाखल.

मुंबईच्या मीरा रोड स्थानकावर एक लाजीरवाणा प्रकार घडला. महिलांच्या डब्यात चढलेल्या मद्यधुंद पोलीस हवालदाराने महिलांना अश्लील नजरेनं पाहिलं. तसेच काही महिलांना स्पर्श देखील केला, असा गंभीर आरोप आहे. संतप्त महिलांनी याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Drunk Constable Arrested for Harassing Women
मोठी बातमी! शिंदे गटातील नेत्याच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी ५ लाख रूपये घेताना रंगेहाथ पकडलं

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास बोरिवलीहून विरारच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये घडली. काही महिलांनी आरोप करत म्हटलं की, पोलीस हवालदारानं अश्लील नजरेनं महिलांकडे पाहिलं. नंतर तिकीट तपासण्याच्या बहाण्यानं महिलांचे मोबाईल हिसकावून घेतले. तसेच काही महिलांना स्पर्श करत अश्लील हावभाव केले.

याच त्रासाला कंटाळून महिलांनी पोलीस हवालदाराला नायगाव पोलीस ठाण्याजवळ उतरवले. तसेच रेल्वे स्टेशनवर जाऊन याची माहिती दिली. त्यानंतर स्टेशन मास्टरनं वसई रोड रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. महिला प्रवाशांनी पोलीस हवालदाराविरोधात वसई रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Drunk Constable Arrested for Harassing Women
स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम', धाड टाकत पोलिसांकडून वेश्या व्यावसायाचा भंडाफोड; नांदेडमध्ये खळबळ

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले की, अमोल किशोर सपकाळ असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारीनुसार, पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Drunk Constable Arrested for Harassing Women
तहसील कार्यालयात दारू पार्टी; हातात दारूचा ग्लास अन् गाण्यावर ठुमके, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com