Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडबाबत मोठी अपडेट; प्रकल्पाची प्रगती कुठपर्यंत आली? वाचा सविस्तर

Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे.
Mumbai Coastal Road Project
Mumbai Coastal Road ProjectYandex

मुंबई कोस्टल रोडबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत आलंय, ते आपण जाणून घेऊ या. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका 18 ते 19 एप्रिल दरम्यान कोस्टल (Mumbai Coastal Road Project) रोडला वांद्रे-वरळी सी लिंकने जोडणाऱ्या बो-स्ट्रिंग पुलाच्या अंतिम गर्डरचे लोकार्पण करणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अजून सुखकर होणार असल्याचं दिसत आहे.

हा पूल प्रीफेब्रिकेटेड स्ट्रक्चरमध्ये आहे. अधिकाऱ्यांनी १४ एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील न्हावा जेट्टीवरून अंतिम गर्डर लोड केले गेले आहेत. ते 18 एप्रिलपर्यंत कामाच्या ठिकाणी पोहोचणे अपेक्षित (Mumbai News) आहे. ११ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन पार पडले होते. कोस्टल रोड प्रकल्प एकूण १०.५८ किलोमीटर लांब आहे. या प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हा बो-स्ट्रिंग ब्रिज लॉन्च झाल्यानंतर, तो मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी (Mumbai Coastal Road) करणारी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. हवामान आणि भरती-ओहोटीच्या परिस्थितीनुसार गर्डरचे अंतिम लॉन्चिंग होण्यास सुमारे दोन दिवस लागतील,” असं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे नियोजन प्रमुख, पवन पडियार यांनी रविवारी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं आहे.

Mumbai Coastal Road Project
Coastal Road Tunnel: कोस्टल रोडचा साईन बोर्ड तीन आठवड्यांतच बदलला, कारण काय?

गर्डर सुरू करण्याची प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये सुरू झाली होती. या ठिकाणी सुरुवातीला लहान आकाराचे गर्डर्स कार्यस्थळावर आणण्यात (Coastal Road Project) आले होते. गर्डरचे लोकार्पण झाल्यानंतर डांबरी रस्ते तयार करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस हा संपूर्ण रस्ता कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट (Mumbai Coastal Road Status) आहे. एमसीआरपी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांसमोर हा ब्रिज बनवणे हा एक मोठा अडथळा होता.

Mumbai Coastal Road Project
Mumbai Costal Road: कोस्टल रोडवरुन उद्घाटनानंतर २४ तासांत किती वाहनांनी केला प्रवास? आकडेवारी आली समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com