Coastal Road Tunnel: कोस्टल रोडचा साईन बोर्ड तीन आठवड्यांतच बदलला, कारण काय?

Coastal Road Tunnels Board: कोस्टल रोडचा साईन बोर्ड बदलला आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनाला तीन आठवडे झाले आहेत. त्यानंतर मुंबई पालिकेने लगेचच हा बोर्ड बदलला आहे.
Coastal Road Tunnel
Coastal Road TunnelSaam Tv

BCM Changed Coastal Road Tunnels Board

तीन आठवड्यांपूर्वी कोस्टल रोडचं (Coastal Road) उद्घाटन पार पडलं होतं. त्यावेळी “भारताचा पहिला समुद्राखालील बोगदा” असा बोर्ड लावण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबई पालिकेने नेपियन सी रोडजवळील कोस्टल रोड बोगद्याचा साइनबोर्ड बदललं आहे. आता या नव्या बोर्डवर त्यांनी 'टीबीएम तंत्रज्ञान वापरून तयार केलेला सर्वात मोठा व्यासाचा बोगदा' असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

त्यांनी हा बोर्ड का बदलला, ते आपण पाहू या. कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर तीन आठवड्यात बीएमसीने नेपियन सी रोडजवळील बोगद्याच्या प्रवेशद्वारावर एक साइनबोर्ड बदलला(Coastal Road Tunnels Board) आहे. सामाजिक कार्यकर्ता झोरू भरूचा यांनी सोशल मीडियावर बीएमसीच्या या दाव्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यामुळे मुंबई पालिकेने हा बोर्ड बदलण्याचा निर्णय घेतला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता या नव्या बोर्डनुसार तो एक टीबीएम तंत्रज्ञान वापरून तयार केलेला सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा आहे. परंतु बीएमसीने झोरू भरूच्या यांच्या दाव्यामुळे बोर्ड बदलल्याच्या कारणाला नकार दिला (BCM Changed Coastal Road Tunnels Board) आहे. हे फक्त एक व्हेरिएबल संदेश चिन्हासारखे आहे. पुढील काळात भारतात प्रथमच सॅकार्डो वेंटिलेशन सिस्टमशी संबंधित असेल, असं कोस्टल रोड प्रकल्पाशी संबंधित बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एल अँड टी अधिकाऱ्याने सांगितलं की, सोशल मीडियावर झालेल्या टीकेमुळे हा बोर्ड बदलण्यात आला आहे. हा बोगदा मरीन ड्राइव्हपासून सुरू होतो. गेल्या महिन्यात कोस्टल रोडचं उद्घाटन (BCM) झाल्यानंतर भथेना यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं की, हा बोगदा मलबार हिलच्या खाली आहे. तो किनारपट्टीला लागून जात आहे.तो समुद्रातून जात नाही किंवा समुद्राच्या खाली बांधलेला नाही, त्यामुळे बीएमसीने लावलेल्या बोर्डवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

Coastal Road Tunnel
Mumbai Costal Road Map News : मुंबई मधील कोस्टल रोड कुठून कसा जाणार? जाणून घ्या!

मंगळवारी पहिल्यांदाच कोस्टल रोडचा वापर करणाऱ्या वाशीतील रहिवासी आमोद ताम्हणकर यांनी नवीन (Mumbai News) फलकाचं छायाचित्र काढलं. त्यानंतर बोर्डावरील नावात बदल झाल्याची चर्चा सुरू झाली. भरूचा यांनी या बोर्ड बदलल्याबद्दल मुंबई पालिकेचे आभार मानले आहेत.

Coastal Road Tunnel
Mumbai Costal Road: कोस्टल रोडवरुन उद्घाटनानंतर २४ तासांत किती वाहनांनी केला प्रवास? आकडेवारी आली समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com