Mumbai News: मुलुंड आणि भांडुपकरांसाठी खुशखबर; वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी बीएमसी बांधणार तीन पूल

Mulund Bhandup Bridges: मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिका तीन नवे पूल बांधणार आहे. त्यासाठी २२ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.
Mulund Bhandup Bridges
Mulund Bhandup BridgesSaam Tv
Published On

Three Bridge Constructed Between Mulund Bhandup

मुलुंड आणि भांडुपमध्ये तीन नवे पूल बांधले जाणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना तीन नवीन पूल मिळणार आहेत. मुंबई महापालिका हे पूल बांधणार आहे. या भागातील काही पूल जुने झाले (Mulund Bhandup Bridges) आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. नव्या पूलांमुळे वाहतुक कोंडी दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Latest Marathi News)

मुलुंड पूर्व येथील नानेपाडा नाल्यावरील पूल जुना झाला आहे. त्यामुळे तो पूल पाडून आता नव्याने बांधण्यात येत आहे. तर मुलुंड पश्चिमेकडील सेवाराम लालवाणी रोड आणि शिव मंदिराजवळील पूल आणि भांडुप येथील बॉम्बे ऑक्सिजन नाल्यावरील पूल (Bridge Construction) यांचंही रुंदीकरण करण्यात येणार आहे.त्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या तीन पुलांसाठी मुंबई महापालिका सुमारे २२ कोटी रुपये खर्च करणार आहे. मुलुंड पूर्व, जयहिंद कॉलनी मिठागर परिसराला जोडणाऱ्या नानेपाडा नाल्यावरील पुल अरूंद आहे. त्यामुळे या पूलावरून मोठी वाहने वळविण्यास मोठी अडचण (Mumbai News) होते. त्यामुळं या पुलाची रूंदीकरण करण्याची मागणी तत्कालीन नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने या पुलाची रूंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

पश्चिमेकडील सेवाराम लालवाणी रोड आणि शिव मंदिराजवळील पुलांचं कामही केलं जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी नानेपाडा पुलाचे काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु नाल्याच्या खोलीकरणाचं काम करत असताना जमिनीत मोठा खडक (Bridge Will Constructed Between Mulund Bhandup) लागला. त्यामुळं पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून गाळ काढण्याचं काम काही काळ थांबविण्यात आलं होतं.खडक फोडून इतर कामे मार्गी लागल्यानंतर आता पुन्हा पुलाच्या स्लॅबचं काम सुरू आहे.

Mulund Bhandup Bridges
Francis Scott Bridge: फ्रांसिस स्कॉट पुलाला ९४८ फूट लांबीच्या जहाजाची धडक; ३ KM लांबीचा पूल नदीत कोसळला Video Viral

येत्या पावसाळ्याच्या अगोदर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका करत आहे, अशी माहिती भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी दिलीय. भांडुपमधील बॉम्बे ऑक्सिजन नाला हा मोठा नाला (Mulund Bhandup Bridge Update) आहे. हरिश्चंद्र कोपरकर मार्ग हा भांडुप पूर्वेकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या जंक्शनपासून त्याला उतार आहे. हा उतार नाहूर पुलाच्या (Bridge) प्रस्तावित रुंदीकरणामुळे आणखी खडतर होईल, तो वाहनांच्या वाहतुकीला अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळं या पुलाचं काम केलं जाणार असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

Mulund Bhandup Bridges
Francis Scott Bridge : मोठी बातमी! अमेरिकेत पुलाला धडकलेल्या जहाजावर होते २२ भारतीय; कंपनीने दिली माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com