Francis Scott Bridge : मोठी बातमी! अमेरिकेत पुलाला धडकलेल्या जहाजावर होते २२ भारतीय; कंपनीने दिली माहिती

Francis Scott Bridge : अमेरिकेतील बाल्टिमोर येथील पुलावर एक कंटेनर जहाज धडकून ३ किमी लांबीचा संपूर्ण पूलाला जलसमाधी मिळाली आहे. याच जहाजासंबंधात एक मोठी माहिती समोर आली आहे.
Francis Scott Bridge
Francis Scott Bridge Saam Digital

Francis Scott Bridge

अमेरिकेतील बाल्टिमोर येथील पुलावर एक कंटेनर जहाज धडकून ३ किमी लांबीचा संपूर्ण पूलाला जलसमाधी मिळाली आहे. याच जहाजासंबंधात एक मोठी माहिती समोर आली आहे. जहाजातील सर्व क्रू मेंबर्स भारतीय असून दुर्घटनेत अनेकांची जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दोन पायलटसह सर्व क्रू मेंबर्सचा शोध लागला असून आतापर्यंत कोणतंही जीवितहानीचं वृत्त नाही. सिंगापूरचा ध्वज असलेलं कंटेनर जहाज ग्रेस ओशन पीटीई लिमिटेडचं असून या कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. हे जहाज बाल्टिमोरहून कोलंबोला जात होते.

अमेरिकेच्या मेरीलँडमधील पेटाप्सको नदीवर असलेल्या 'फ्रांसिस स्कॉट' पुलाला एक कार्गा जहाज धडकल्याची घटना घडलीय. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री दीड वाजता ही दुर्घटना घडली. पुलाला जहाज धडकल्यानंतर त्याला आग लागलीय. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. (Latest News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मेरीलँड ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीने सांगितलं की, दुर्घटनेनंतर वाहतूक बंद करण्यात आलीय. फ्रांसिस स्कॉट पुलाला धडकणारे जहाज ९४८ फूट लांबीचं होतं. पेटाप्सको नदीवर १९७७ मध्ये फ्रांसिस स्कॉट पूल उभारण्यात आला होता. या पुलाचं नाव अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणारे फ्रांसिस स्कॉट यांच्या नावावर ठेवण्यात आले होते.

दाली जहाजावरील दोन्ही कप्तान आणि संपूर्ण क्रू सुरक्षित असल्याची माहिती जहाजाच्या मालकी कंपनीने दिलीय. या कार्गा जहाजाची पुलाला धडक कशामुळे झाली याचे कारण अजून समोर आले नाहीये. या अपघाताचा तपास जहाजाचे मालकाकडून केला जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार , बाल्टिमोर हार्बरमध्ये पाण्याचं तापमान ९ डिग्री सेल्सिअस आहे. अमेरिका सेंटर फॉर डीसीज कंट्रोलननुसार, २१ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याने मानवी शरीरातील तापमान सुद्धा कमी होत असते. यामुळे पाण्यात बुडालेल्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.

मागील वर्षी बाल्टिमोर बंदरावरून ६.६७ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची वाहतूक केली जाते. मैरीलँड सरकारची वेबसाइटनुसार, गेल्या वर्षी बाल्टिमोर पोर्ट पासून जवळपास ५.२ कोटी टनच्या इंटरनॅशनल कार्गोची वाहतूक झाली होती. त्याची किंमत ६.६७ लाख कोटी रुपये होती. या पोर्टच्या माध्यमातून १५ हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला होता.

Francis Scott Bridge
PNS Siddiqui Naval Air Base : पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला; स्फोटकं घेऊन आंतकवादी शिरले हवाईतळावर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com