मुंबईच्या वडाळ्यात गटार सफाईसाठी बालकामगारांचा वापर? बीएमसी-कंत्राटदारांवर गंभीर आरोप

wadala news : मुंबईच्या वडाळा पूर्वेत गटार सफाईसाठी बालकामगारांचा वापर करत असल्याचा वापर स्थानिकांनी केला आहे.
wadala news
mumbai wadalaSaam tv
Published On
Summary

मुंबईत गटार सफाई कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित

वडाळ्यात सफाई करण्यासाठी बालकामगारांचा वापर

संजय गडदे, साम टीव्ही

पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या नाला आणि गटार सफाई कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वडाळा (पूर्व) येथील एलबीएस नगर आणि कोर्बा सॉल्ट पॅन परिसरात गटारे आणि नाल्यांची सफाई करण्यासाठी बालकामगारांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

नाल्यांच्या यांत्रिक सफाईसाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना प्रत्यक्षात लहान मुलांकडून हाताने गटारातील कचरा काढून घेतला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. याशिवाय बालकामगारांना अशा धोकादायक ठिकाणी काम करण्यास भाग पाडणाऱ्या कंत्राचा आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील आता जोर धरू लागली आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित खासगी कंत्राटदारांकडून खोल नाल्यांमधील कचरा आणि गाळ काढण्यासाठी अल्पवयीन मुलांना कामावर लावले जात आहे. या मुलांना कोणतीही सुरक्षा साधने, हातमोजे, बूट, मास्क किंवा इतर संरक्षणात्मक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

wadala news
Shocking : संतापजनक! ST महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून कर्मचारी महिलेचा विनयभंग; शरीरसुखाचीही केली मागणी

नाला सफाईसारखे धोकादायक आणि आरोग्यासाठी घातक काम बालकामगारांकडून करून घेणे हे बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायद्याचे उल्लंघन असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच, अशा प्रकारच्या कामांमुळे बालहक्कांचे गंभीर उल्लंघन होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे संबंधित कंत्राटदारांसह महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यांत्रिक पद्धतीने नाला सफाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात काम कशा पद्धतीने केले जात आहे, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या आरोपांची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि बालकामगारांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, बालहक्क आयोग, कामगार विभाग, मुंबई पोलीस आणि महापालिका यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने तपास सुरू करावा, अशीही मागणी पुढे येत आहे.

wadala news
सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ, गटारात उतरून सफाई, टिटवाळ्यात सुरक्षा नियमांची पायमल्ली उघड

पावसाळ्यापूर्वी नाला सफाई कामांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षिततेबाबत आधीच प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचदरम्यान वडाळा येथील हा प्रकार समोर आल्याने महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. मात्र, या आरोपांबाबत महापालिका किंवा संबंधित कंत्राटदारांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com