

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
एलफिस्टन पुलाच्या पाडकामासाठी मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर एलफिस्टन पुलाच्या कामासाठी मेगाब्लॉकच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. एलफिस्टन पुलाच्या कामासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने काम होणार आहे.
एलफिस्टन पुलासाठी पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहे. शेवटच्या सहा तासात सर्व गर्डर हटवणार आहेत. पहिला ब्लॉक यशस्वी झाला आहे. यापुढेही एलफिस्टन रोडच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. जुन्या रेल्वे पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा टप्पा निश्चित केला आहे.रेल्वे मार्गावरील १३२ मीटर लांबीचा मुख्य गर्डर आणि पॅनल हटवण्यासाठी एकूण २६ तासांचे सहा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर एकूण ६ मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहिला चार तासांचा मेगा ब्लॉक सोमवारी मध्यरात्री घेण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान पुलावरील जड पॅनल हटवण्यात आला आहे, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२६ तासांचे वेगवेगळ्या टप्प्यात सहा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रत्येक ब्लॉक ४ तासांचा असणार आहे. यामध्ये पाच जड पॅनल हटवण्यात येणार आहे. तर मुख्य पॅनल हटवण्यासाठी सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकमध्ये पुलावरील जड पॅनेल काढणे, पॅनल हटवल्यानंतर मुख्य लोखंडी गर्डर आणि बीम काढले जाणार आहे. या कालावधीत ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर काम पूर्ण होणार आहे.
या रेल्वे मार्गिका राहणार बंद
मेगाब्लॉकच्या कालावधीत दादर ते छत्रपती संभाजी नगरदरम्यानच्या सर्व रेल्वे काही काळासाठी बंद ठेवाव्या लागू शकतात. शक्यतो हा मेगा ब्लॉक रात्रीच घेण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.