Mumbai Local News : मुंबईत मुसळधार पावसाचा हाहाकार; लोकल सेवा पुन्हा विस्कळीत, प्रवाशांचे हाल

mumbai local News update : मुंबईत मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. या पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.
mumbai Rain
mumbai local NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील काही भागातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईची मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील कल्याणवरून कर्जत आणि कसाराकडे जाणाऱ्या लोकला सेवा उशिराने धावत आहेत.

mumbai Rain
Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेसोबत १६ मेआधी काय काय घडलं? सगळं गूढ उकलणार

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसाचा सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबईतील मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलला बसला आहे. मुंबईत सकाळी मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. त्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.

mumbai Rain
BJP Leader Accident : बीडमधील भाजप नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; कारचा अक्षरश: चक्काचूर

पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने कल्याणवरून कर्जत आणि कसाराकडे जाणाऱ्या लोकल सेवा 20 ते 25 उशिरा धावत आहेत.कल्याण स्थानकावरून घरी परतणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांची कल्याण स्थकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. तर लांब पल्ल्याच्या गाडी देखील उशिरा असल्याने कल्याण स्थानकावर प्रवासी ताटकळत बसले आहेत.

mumbai Rain
Viral News : मनोहरलाल धाकडनंतर आणखी एका भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मान्सूनपूर्व सुरू असलेल्या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणामुळे रेल्वे विस्कळीत आहे. रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

पावसामुळे मुंबईकरांचे हाल

दरम्यान, मुंबईतील मुसळधार पावसामुळे लोकल सेवा कोलमडली. मुसळधार पावसामुळे दुपारी कुर्ला, सायन, मस्जीद बंदर स्थानकाजवळ रुळावर पाणी साचलं. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे लोकल सेवा १० मिनिटे उशिराने होत्या. रस्त्यावरही वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com