Boss Vs Employee: टार्गेट पूर्ण न करता मागितलं इन्सेन्टिव्ह; बॉसने घडाळ्याने फोडलं डोकं

Boss Attacks On Employee: एखाद्यावेळी टार्गेट पूर्ण झालं नसेल कर त्या कर्मचाऱ्याला बॉसच्या रोषाला सामोरं जावं लागतं. जे स्वाभाविकच आहे. मात्र...
Boss Attacks On Employee
Boss Attacks On EmployeeSakal
Published On

Mumbai Viral News: कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना कंपनीकडून कर्मचाऱ्याला टार्गेट दिलं जातं. ते टार्गेट कर्मचाऱ्यांकडून पूर्ण करुन घेण्याची जबाबदाही बॉसची असते. अनेकदा टार्गेट पूर्ण होत नाही, तेव्हा बॉस (Boss) आणि कर्मचारी यांच्यात खटके उडतात. टार्गेट पूर्ण न केल्याने बॉसचं रागावनं स्वाभाविकच आहे. पण, तो बॉस जर संयमी नसेल तर पुढचे परिणाम भयंकर असतात. मुंबईतल्या अशाच एका रागीट बॉसनं आपल्याच कर्मचाऱ्याच्या (Employee) डोक्यात घड्याळ फेकून मारल्याची घटना घडली. कर्मचाऱ्याला दिलेलं टार्गेट पूर्ण न झाल्याने बॉसला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात थेट कर्मचाऱ्याचं डोकं फोडलं आहे. याप्रकरणी जखमी कर्मचाऱ्याने पोलिसांत धाव घेतली असून रागीट बॉसविरोधात गुन्हा दाखल केला आहे (Boss Attacks On Employee)

Boss Attacks On Employee
Twitter Blue Tick: ट्विटर विकत घेताच एलन मस्कचा यूजर्सना झटका; Verification Badgeसाठी मोजावे लागणार पैसे

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद हवालदार सिंग असं या ३० वर्षीय कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्याचे ३५ वर्षीय मॅनेजर अमित सुरेंद्र सिंग याने त्याला हेल्थ इन्शुरन्स विकण्याचं टार्गेट दिलं होतं. पण आनंद त्याचं हे टार्गेट पूर्ण करू शकला नाही. आनंद या कंपनीमध्ये गेल्या वर्षीपासून असोसिएट क्लस्टर मॅनेजर म्हणून काम करत आहे. तो सप्टेंबर महिन्याचं टार्गेट पूर्ण करू शकला नाही. त्याला ५ लाखांचा बिझनेस मिळवून देण्याचं टार्गेट होतं, मात्र तो केवळ दीड लाखांचाच बिझनेस आणू शकला. त्यामुळे आनंदने ९ ऑक्टोबरला राजीनामा दिला होता. (Mumbai Viral News)

आनंदने राजीनामा दिला, पण अमितने मात्र आनंदचा राजीनामा स्वीकारला नाही आणि शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास त्याला ऑफिसला बोलवून घेतलं, यावेळी अमितने आनंदला कामाची सविस्तर माहिती द्यायला सांगितली. आनंदने आपण आपले टार्गेट्स पूर्ण केले नसल्याचं सांगितलं आणि संध्याकाळपर्यंत सर्व माहिती देण्याचं कबूल केलं. मात्र तरीही अमित सातत्याने फोनवरुन त्याला शिवीगाळ करत राहिला. संध्याकाळी पुन्हा अमितने आनंदला भेटायला बोलावलं. तेव्हा आनंदने त्याच्याकडे इन्सेन्टिव्ह मागितला पण अमितने तो देण्यास नकार दिला.

यानंतर आनंदने हा विषय सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर चर्चिला जावा, अशी मागणी केली. यामुळे अमित चिडला आणि त्याने त्याच्या टेबलावरचं घड्याळ उचललं आणि आनंदच्या डोक्यात मारलं. यावेळी ते घड्याळ तर तुटलंच पण आनंदच्या डोक्यातूनही रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर आनंदच्या सहकाऱ्यांनी त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी आनंदच्या डोक्यातून प्लास्टिकचे तुकडे काढले आणि त्याला टाके घातले. याबाबत आनंदने रीतसर तक्रार नोंदवली असून पोलिसांनीही याबाबत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. (Breaking Marathi News)

Boss Attacks On Employee
धक्कादायक! WiFi चा पासवर्ड न दिल्याच्या रागात दोघांकडून एका अल्पवयीन मुलाची भरस्त्यात हत्या

बॉस इज ऑलवेज राईट असं म्हटलं जातं. कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्यासाठी बॉस विविध युक्त्या लढवत असतो. कधी कर्मचाऱ्यांना प्रेमाने तर कधी कठोर होऊन त्याला कर्मचाऱ्याकडून का करवून घ्यावं लागतं. कर्मचारीही आपल्याला दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी झटत असतात. अनेकदा ते पूर्ण होतं पण, एखाद्यावेळी टार्गेट पूर्ण झालं नसेल कर त्या कर्मचाऱ्याला बॉसच्या रोषाला सामोरं जावं लागतं. जे स्वाभाविकच आहे. मात्र, कर्मचाऱ्याशी बोलाताना भाषेची मर्यादा आणि भाषेची पातळी ओलांडणारे बॉस हे कर्मचाऱ्यांना छळत असतात. असे रागीट बॉस कर्मचाऱ्यांना आणि कंपनीला कधीही पुढे नेऊ शकत नाही, हेही तिककचं खरं. या प्रकरणामुळे बॉस इज नॉट ऑलवेज राईट हे सिद्ध झालं आहे. (boss is not always right)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com