धक्कादायक! WiFi चा पासवर्ड न दिल्याच्या रागात दोघांकडून एका अल्पवयीन मुलाची भरस्त्यात हत्या

Navi Mumbai Crime News: आरोपी हे नवी मुंबईतील कामोठे येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात.
WiFi Password Crime News
WiFi Password Crime NewsSaam TV
Published On

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंटरनेट वापरण्यासाठी वायफायचा पासवर्ड (Password) न दिल्याने दोन तरुणांची एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली आहे. नवी मुंबईतील कामोठे परिसरात ही दुर्देवी घटना घडली. विशेष बाब म्हणजे हत्येतील दोन्ही आरोपींनी भररस्त्यात ही हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Navi Mumbai)

WiFi Password Crime News
Twitter Blue Tick: ट्विटर विकत घेताच एलन मस्कचा यूजर्सना झटका; Verification Badgeसाठी मोजावे लागणार पैसे

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे नवी मुंबईतील कामोठे (Kamothe) येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात. या दोघांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला इंटरनेट वापरण्यासाठी वायफायचा पासवर्ड विचारला, मात्र त्या मुलाने पासवर्ड शेअर करण्यास नकार दिला. याचा राग या दोन्ही आरोपींनी मनात ठेवला आणि त्यांनी या अल्पवयीन मुलाची निर्घृण त्याची केली.

WiFi Password Crime News
Mumbai Crime News : विकृती! फूड डिलिव्हरी बॉयकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, आता आली पश्चातापाची वेळ

कामोठे परिसरातल्या सेक्टर 14 येथे भर रस्त्यात हा प्रकार घडलाय. आरोपी रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी हे दोघेही सफाई कामगार म्हणून काम करतात. तर मृत झालेला अल्पवयीन विशाल मौर्य हा बेकरी मध्ये काम करतो. विशाल मोर्यने आपला इंटरनेट पासवर्ड देण्यास नकार दिल्याच्या रागातून रवींद्र आणि राज यांनी विशालला भररस्त्यात गाठत त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात विशालचा मृत्यू झाला असून कामोठे पोलिसांनी दोन्हीही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com