Twitter Blue Tick: ट्विटर विकत घेताच एलन मस्कचा यूजर्सना झटका; Verification Badgeसाठी मोजावे लागणार पैसे

Elon Musk Twitter News: एलन मस्क यांचं बिझनेस माईंड पाहता ही शक्यता जास्त वाटते. याशिवाय ट्विटरमध्ये अनेक बदल केली जाण्याची शक्यता आहे.
Elon Musk Twitter News
Elon Musk Twitter NewsSaam TV

Twitter Verification Badge News: टेस्ला आणि स्पेस एक्सचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी आता जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया असेलल्या ट्विटरलाही (Twitter) विकत घेतलं आहे. म्हणजेच एलन मस्क (Elon Musk) आता ट्विटरचेही मालक झाले आहेत. ट्विटरची मालकी मिळताच सर्वात अगोदर त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक सहकाऱ्यांची हकालपट्टी केली.

यानंतर मस्क हे ट्विटरच्या बाबतीत आणखी एक मोठा निर्णय घेणार आहेत. ट्विटरवर ब्ल्यू टिक असलेल्या यूजर्सना म्हणजेच व्हेरिफाईड बॅड्ज असलेल्या वापरकर्त्यांना आपलं ब्ल्यू टिक (Twitter Verification Badge) अबाधित राखण्यासाठी ट्विटरला पैसे मोजावे लागू शकतात. म्हणजेच यापूर्वी मोफत असलेलं हे ब्लू टिक आता पैसे देऊन वापरावं लागणार आहे. (Twitter Latest News)

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, ट्विटर ब्लू टिक असलेल्या वापरकर्त्यांना आता पैसे आकारण्याची योजना आखत आहे. यानुसार ब्लू टिक अबाधित राखण्यासाठी ट्विटर या वापरकर्त्यांना दर महिन्याला $20 (20 डॉलर) एवढे पैसे आकारण्याची शक्यता आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सध्या याची किंमत 1646.89 रुपये इतकी होते. याबाबत सध्यातरी ट्विटरने अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र एलन मस्क यांचं बिझनेस माईंड पाहता ही शक्यता जास्त वाटते. याशिवाय ट्विटरमध्ये अनेक बदल केली जाण्याची शक्यता आहे.

ट्विटर हेडकॉर्टरमध्ये पोहोचल्यानंतर मस्क यांनी 'the bird is freed' म्हणजे पक्षी आता मुक्त आहे असं ट्विट केलं होतं. यावरुन आगामी काळात ट्विटरमध्ये मस्क हे मोठे बदल करणार असल्याचे संकेत मिळतायत. ब्ल्यू टिक असणारे ट्विटर खाती म्हणजे एकप्रकारे सेलिब्रिटीप्रमाणे असतात. सर्वांनाच हे ब्ल्यू टिक मिळत नाही, त्यामुळे या ब्ल्यू टिकचे महत्व जास्त आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com