Borivali News: ह्रदयद्रावक! अचानक घराचा पोटमाळा कोसळला अन् घडला अनर्थ... दीड महिन्याच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू

Borivali News: बाळ झोपेत असताना अचानक पोटमाळा कोसळला आणि या दुर्घटनेत दीड महिन्यांच्या आर्यन पालचा मृत्यू झाला..
Borivali News
Borivali NewsSaamtv
Published On: 

सचिन गाड, प्रतिनिधी...

Borivali News: एकीकडे राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह सुरू असतानाच बोरीवलीमधून एक ह्रदयद्रावक घटना घडली. बोरिवलीच्या गणपत पाटीलनगर येथे घराचा पोटमाळा कोसळला. ज्यामध्ये दीड महिन्याच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Borivali News
Kolhapur News: काळीज पिळवटून टाकणारी घटना! विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा

याबाबच अधिक माहिती अशी की, घराचा पोटमाळा कोसळून झालेल्या अपघातात कुटुंबाने आपलं दीड महिन्याचं बाळ गमावल्याची घटना घडली आहे. पोटमाळा कोसळल्याने झालेल्या अपघातात या तान्ह्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

बोरीवलीच्या गणपत पाटीलनगर येथे हा प्रकार घडला. बाळ झोपेत असताना अचानक पोटमाळा कोसळला आणि या दुर्घटनेत दीड महिन्यांच्या आर्यन पालचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Borivali News
Satara Pandharpur Highway : आषाढीचा याेग साधून संगम माहुली ग्रामस्थांनी राेखला सातारा पंढरपूर महामार्ग

कोल्हापूरात माय-लेकाचा मृत्यू...

कोल्हापुरात (Kolhapur) दुर्देवी घटना घडली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे विजेच्या तारांचा स्पर्श होवून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले. नंदा मगदूम व अजय मुगदुम अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.