देवा या शब्दावरून शाब्दिक कोट्या झालेल्या असल्या तरी महापौर पद ठाकरेसेनेकडे जाऊ शकत की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय... आणि त्याला कारण ठरलयं....महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत...
22 जानेवारीला महापौरपदासाठी आरक्षणाची लॉटरी काढली जाणार आहे... यावेळी चक्राकार पद्धतीनं महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होणार आहे...चक्राकार पद्धतीत गेल्या 20 वर्षांचे आरक्षण वगळून इतर प्रवर्गांची चिठ्ठी सोडतीसाठी टाकली जाते... आतापर्यंत खुला, SC, OBC प्रवर्गासाठी आरक्षण सोडत महापौरपदासाठी निघाली आहे... मात्र ST प्रवर्गासाठी आरक्षण सोडत न निघाल्यानं यावेळी ST प्रवर्गातून महापौर होण्याची शक्यता जास्त आहे. भाजप आणि शिंदेसेनेकडे एससी आणि ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक आहेत. पण एसटी प्रवर्गातील नगरसेवक नसल्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
मात्र ठाकरेसेनेचे ST प्रवर्गातून दोन नगरसेवक निवडून आले आहेत. . त्यामुळे ठाकरेसेनेच्या या दोन नगरसेवकांना खूपच महत्व आलं आहे. वार्ड क्रमांक 121 मधून विजयी झालेल्या प्रियदर्शिनी ठाकरे आणि वार्ड 53 मधून निवडून आलेले जितेंद्र वलवी हे ठाकरेसेनेचे दोन नगरसेवकच एसटी प्रवर्गातून येतात...त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून या दोन नगरसेवकांवर दबाब आणला जात असल्याची माहिती सूत्रांना दिलीय...
दरम्यान ठाकरेसेनेकडून दोन्ही नगरसेवकांची विशेष काळजी घेतली जातेय...त्यात भाजप 2022 पासून निवडणुक न झाल्याचं कारण देत चक्राकार आरक्षण यावर्षीपासून नव्यानं सुरु करावं, अशी मागणी आयोगाकडे करू शकतं. मात्र ST प्रवर्गातून महापौर पदासाठी सोडत निघाल्यास बहुमत नसूनही ठाकरेसेनेचा महापौर येऊ शकतो..आता महापौरपदाची ही चक्राकार सोडत भाजपसाठी पेच निर्माण करणारी ठरणार का.., 'ठाकरे' आडनाव पुन्हा एकदा मुंबईत सत्तेच्या केंद्रस्थानी येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.