गेले कित्येक वर्ष मुंबईत हा आवाज घुमायचा आणि त्याच बिनचूक उत्तर शिवसेना असंच यायचं..मात्र आता या आवाजावर मर्यादा आल्या कारण महापालिका निवडणुकांचा निकाल...या निकालांनी ठाकरेंची मुंबई महापालिकेवरची गेल्या पाव शतकाची सत्ता संपुष्टात आणली..
२० वर्षांनी एकत्र आलेले ठाकरे बंधू, त्यानिमित्तानं एकत्र आलेली दोन्ही कुटुंब,मराठी मनाला घातलेली साद, मुंबईतील मराठी माणूस टिकावा म्हणून सत्ताधाऱ्यांसह मुंबईला ओरबाडणाऱ्य़ांवर केलेला हल्लाबोल...असं बरच काही ठाकरेंनी केलं पण शेवटी ठाकरें बंधूना शंभरी गाठता आली नाही आणि देशाच्या आर्थिक राजधानीची तब्बल ७४ हजार कोंटींची मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली....
त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेत पडलेली उभी फूट..शिंदेसेनेमुळे मुबंईतील आधीच 35 टक्क्यांपर्यंत घसरलेल्या मराठी मतांचं विभाजन झालं...मनसे सोबत गेल्यानं मुंबईत गेल्या दहा-पंधरा वर्षात २२ ते २५ टक्क्यांपर्यंत गेलेली उत्तर भारतीयांची मत काही प्रमाणात दुरावली..याचाच फायदा घेत भाजपनं अमराठी वॉर्डांमध्ये विकासाच्या मुद्दयावरून केलेला प्रचार.. मराठी अस्मितेचा मुद्दा तापवल्यानं इतर भाषिक भाजपकडे वळले.
लोकसभेला ठाकरेंसोबत असलेला मुस्लिम मतदार पालिकेत मात्र पुन्हा काँग्रेस आणि एमआयएमकडे वळला.
आणि शेवटचा मुद्दा अँटी-इन्कबन्सीचा.. गेली चार वर्ष जरी पालिकेवर प्रशासक राज असलं तरी वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईच्या बदलत चाललेल्या समस्या, रस्ते-पाणी आणि नालेसफाईचे मुलभूत प्रश्न, आजच्या युवा वर्गाला आपल्यासोबत जोडण्यासाठी ठाकरेंना आलेलं अपयश या सर्वाच्या नाराजीचा फायदा महायुतीने उचलला.
मुंबई महापालिका हातातून जाणं म्हणजे फक्त सत्ता आणि संसाधन जाण नव्हे तर ते ठाकरेंचं राज्यातलं देशातलंच नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाचं ही पॉवर सेंटर होतं. लोकसभा, विधानसभा, आणि नंतर महापालिका..या सर्वच निवडणुकांमध्ये ठाकरेंना यशापासून दूरच राहावं लागलय....तसं असलं तरी एकहाती लढून ठाकरेसेनेने महापालिका निवडणुकीत मिळवले यश हे दखलपात्रच..
आता तर ठाकरेंनी सूत्र पुढच्या पिढीकडे सोपवली आहेत..त्यामुळे इतिहासाचे दाखले देत आता केवळ भावनिक साद महत्वाची नाही तर त्यासाठी ज्या पक्षाबरोबर त्यांनी २५ वर्षं एकत्र महापालिका सांभाळली त्या पक्षाप्रमाणेच विनिंग स्ट्रॅटजी राबवावी लागेल. मातोश्रीच्या बाहेर पडून जमिनीवर उतरून लढाई लढावी लागेल..ज्या शाखा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत त्या शाखांच नेटवर्क अधिक स्ट्राॅंग करावं लागेल..तरच आव्वाज कुणाचा ही आरोळी पुन्हा एकदा घुमेल...काँग्रेस स्वंतत्र लढल्यामुळे तिरंगी आणि चौरंगी लढती झाल्या. त्यामुळे विरोधी मतांची विभागणी झाली आणि याचा थेट भाजपला झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.