मुंबईतील भाजप आमदाराविरोधात पंतप्रधानांकडे गंभीर आरोप; 'त्या' प्रकरणाला मिळालं वेगळंच वळण

Mumbai Land Dispute : भाईंदर जमीन वादाला नवं वळण मिळालं आहे. PM मोदींचे माजी वर्गमित्र असगरअली वोरा यांनी CBI चौकशीची मागणी केली होती. आता भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडण्याची भूमिका घेतली आहे.
Mumbai Land Dispute
Mumbai Land Dispute
Published On

Narendra Mehta Bhayandar land dispute latest update : मुंबईजवळील भाईंदर पूर्वेतील नवघर परिसरातील एका जमिनीच्या वादावरून ८१ वर्षीय वृद्धाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. असगरअली वोरा असे या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी करत न्यायाची विनंती केली आहे. असगरअली वोरा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र आहेत. दरम्यान, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी त्या जमिनीचा ताबा सोडला आणि प्रकरण मिटवल्याचे वृत्त समोर आले आहे.

पंतप्रधानांचे बालपणीचे मित्र असल्याचा दावा

असगरअली वोरा यांनी असा दावा केला आहे की, ते गुजरातमधील वडनगर येथील 'बी. एन. शाळा' (B. N. High School) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपणीचे वर्गमित्र होते. ८ सप्टेंबर रोजी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा वोरा यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून, पंतप्रधान आपल्या बालपणीच्या मित्राला नक्कीच न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

Mumbai Land Dispute
Crime : धक्कादायक! अज्ञात हल्लेखोरांनी नेत्याला संपवलं, राजकारणात खळबळ; परिसरात प्रचंड तणाव

काय आहे नेमका जमिनीचा वाद?

असगरअली वोरा यांच्या माहितीनुसार, त्यांनी १९८९ मध्ये भाईंदर पूर्वेतील नवघर भागात २,८१० चौरस मीटर जमीन कायदेशीर नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केली होती. मात्र, २०११ च्या सुमारास 'स्वयम बिल्डर्स' आणि स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित 'सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स' यांनी या जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला, असा आरोप वोरा यांनी केला होता. बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचे दोन भाग दाखवण्यात आले आणि ताबा बळकावण्यात आल्याचा त्यांचा दावा होता.

Mumbai Land Dispute
Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांनी मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावली. या बैठकीला असगरअली वोरा, नरेंद्र मेहता, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त आणि नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान आमदार नरेंद्र मेहता यांनी नगररचना विभागाला अधिकृत पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत असल्याचे स्पष्ट केले, तसेच त्या जागेवर बांधकामासाठी मिळालेली सर्व मंजुरी-परवानग्या महापालिकेकडे जमा (सरेंडर) केल्या. याशिवाय, नरेंद्र मेहता यांनी पोलिसांना स्वतंत्र पत्र देऊन असगरअली वोरा यांच्याविरोधात यापूर्वी केलेली तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले आणि दोन्ही पक्षांत आपापसात सामंजस्याने तडजोड झाल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com