Mumbai Road Accidents: मुंबई बनली अपघातांची राजधानी; रस्ते अपघातात मुंबई अव्वल

Mumbai Road Accidents Latest News: महामार्ग पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात रस्ते अपघातत दिवसाला कमीत कमी ३७ ते ४० जणांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले.
Mumbai became the capital of accidents; Mumbai tops in road accidents ...
Mumbai became the capital of accidents; Mumbai tops in road accidents ...Saam TV
Published On

मुंबई: महाराष्ट्रात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक महामार्गांची कामेही युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र तरीही अपघाता़चे प्रमाण कमी न होता.वाढत असून यात मुंंबई (Mumbai) ही अव्वल असल्यची धक्कादायक माहिती महामार्ग पोलिसांच्या (Highway Police) आकडेवारीतून समोर आली आहे. (Mumbai became the capital of accidents; Mumbai tops in road accidents ...)

हे देखील पहा -

Mumbai became the capital of accidents; Mumbai tops in road accidents ...
पेट्रोल-डिझेलच्या दरापासून मिळणार दिलासा? रशियाची भारताला कच्च्या तेलाच्या किमतीवर ऑफर!

राज्यात २०२१ मध्ये २९ हजार ४९४ रस्ते अपघात (Accident) झाले आहे. यामध्ये १३ हजार ५२८ प्रवासी जखमी झाले आहेत तर रस्ते अपघातात १३ हजार ५२८ प्रवाशांचा मृत्यू (Death) झालेला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत होत असून २०२१ मध्ये मुंबईत २२३० सर्वाधिक अपघात झाले असून त्यात ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९४२ जण अपघातात गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.

अपघातांच्या आकडेवारीनुसार, २०२० च्या तुलनेत गेल्या वर्षी राज्यातील रस्ते अपघातात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मृत्यू आणि जखमींच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात २०२० मध्ये २४, ९७१ अपघात, ११, ५६९ मृत्यू आणि १९,९१४ जखमींची नोंद आहे. महामार्ग पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात रस्ते अपघातत दिवसाला कमीत कमी ३७ ते ४० जणांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले. वरील आकडेवारी पाहता साथीच्या रोगापेक्षाही ही रस्ते अपघातात मृत्यू होणारीची संख्या ही लक्ष वेधून घेणारी आहे.

Mumbai became the capital of accidents; Mumbai tops in road accidents ...
संजय राऊत फक्त शरद पवार यांची चमचेगिरी करतात; प्रसाद लाड यांची टीका

रस्ते अपघातांची प्रमुख कारणे:

वाहतूक नियमाचे उल्लंघन

भरधाव वेगाने गाडी चालवणे

मद्यपान करून वाहने चालवणे

जिल्ह्यानुसार सर्वाधिक अपघात:

मुंबई: २ हजार २३०

नाशिक: १ हजार ४२९

पुणे: १ हजार ३६३

अहमदनगर: १ हजार ३६०

कोल्हापूर: १ हजार ०३१

सोलापूर: ९४५

नागपूर: ९६९

सातारा: ८१२

यवतमाळ: ७५५

नांदेड: ७५०

या जिल्ह्यांत २०२१ मध्ये सर्वाधिक अपघात झाले आहेत. रस्ते अपघातासाठी वरील कारणं जरी महत्वाची असली तरी महामार्गावरील काही धोकादायक ठिकाणही (ब्लॅकस्पाॅट) यासाठी जबाबदार आहेत. याच ठिकाणी अनेक अपघात प्रामुख्याने होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख महामार्गांवर ३०० अशी ठिकाणांची नोंद करण्यात आली आहेत. यात मुंबई, नादेंड, नागपूर, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात सर्वाधिक धोकादायक ठिकाणं असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com