Mumbai News: मुंबईतला रिक्षाचालक खरंच महिन्याला ८ लाख रुपये कमावतो, काय आहे सत्य?

Mumbai Auto Rikshwa Driver: मुंबईतील एक ऑटो रिक्षाचालक महिन्याला ५ ते ८ लाख रुपये कमाई करतो अशी माहिती समोर आली होती. या रिक्षाचालकाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या रिक्षाचालकाने स्वत:च यामागचं सत्य सांगितले आहे.
Mumbai News: मुंबईतला रिक्षाचालक खरंच महिन्याला ८ लाख रुपये कमावतो, काय आहे सत्य?
Mumbai Auto Rikshwa DriverSaam Tv
Published On

मयूर राणे, मुंबई

मुंबईतील एक ऑटो रिक्षा चालक महिन्याला ५ ते ८ लाख रुपये कमाई करतो अशी माहिती समोर आली होती. या रिक्षाचालकाची सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे. ही व्यक्ती ऑटो रिक्षा चालवून कशापद्धतीने इचके पैसे कमावते असे अनेक प्रश्न सर्वांना पडले होते. या मागचे सत्य काय आहे ते समोर आले आहे. खरंच हा रिक्षाचालक इतके पैसे कमावतो का? हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबईतील अमेरिका वाणिज्य दूतावास येथील ऑटो रिक्षाचालक महिन्याला तब्बल ५ ते ८ लाख रुपये कमवत असल्याची माहिती समोर आली होती. इतक्या मोठ्या कमाईमुळे या रिक्षा चालकाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण यानंतर यामागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता ही सर्व माहिती खोटी असल्याचे रिक्षाचालकाने स्वत:सांगितले. आदिल असं या रिक्षाचालकाचे नाव आहे.

Mumbai News: मुंबईतला रिक्षाचालक खरंच महिन्याला ८ लाख रुपये कमावतो, काय आहे सत्य?
Mumbai local train News : बापरे! लोकलच्या भर गर्दीत बकरीचा प्रवास; व्हिडिओ तुफान व्हायरल

अमेरिका दूतावास येथे विजा इंटरव्ह्यूसाठी येत असलेले नागरिक त्यांच्यासोबत काही बॅग, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रिक वस्तू घेऊन येतात. या सर्व वस्तू आतमध्ये घेऊन जाण्यास अमेरिका दूतावासात परवानगी नाही. त्यामुळे या व्यक्तींची चांगलीच तारंबळ उडते. मात्र या सर्व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रिक्षा चालक आदिल त्यांना मदत करतो. त्यांच्या बॅगे, इलेक्ट्रिक वस्तूची किंवा अन्य सामान तो घेतो आणि सुरक्षित ठेवतो. यासाठी तो त्यांच्याकडून दिवसाचा दर देखील आकारतो.

Mumbai News: मुंबईतला रिक्षाचालक खरंच महिन्याला ८ लाख रुपये कमावतो, काय आहे सत्य?
Mumbai Crime : चोरी करण्यासाठी अजब फंडा; चोराची शक्कल पाहून पोलिसही चक्रावले, ४१ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा ताब्यात

हा रिक्षाचालक अमिरेकन वाणिज्य दुतावासाबाहेर आपले वाहन पार्क करतो आणि प्रति ग्राहक त्यांच्याकडून १००० रुपये दराने बॅग ठेवण्याची सेवा देतो. दररोज २० ते ३० ग्राहकांसह या रिक्षाचालकाला दररोज २० ते ३० हजार रुपये असे महिन्याला एकूण ५ ते ८ लाख रुपये कमावतो अशी चर्चा होत होती. पण याबाबत या रिक्षाचालकाला विचारले असता त्याने इतकी कमाईची माहिती खोटी असल्याचे सांगितले.

Mumbai News: मुंबईतला रिक्षाचालक खरंच महिन्याला ८ लाख रुपये कमावतो, काय आहे सत्य?
Mumbai Shopping : फक्त २०० रुपयात ट्रेडिशनल ब्लाउज मुंबईत कुठे मिळतात? जाणून घ्या खास ठिकाणं

आदिल यांनी सांगितले की, 'ही सगळी अफवा आहे. असे सांगण्यात आले हजार रुपये आम्ही घेतो. मात्र त्यातले सहाशे रुपये हे लॉकर ज्याचा आहे त्याला जातात आणि चारशे रुपये पासपोर्टचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी घेतले जातात. ४०० रुपये भाडे हे रिक्षावाल्यांचे असते. त्यांचा १३ जणांचा ग्रुप आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून ते अमेरिका दुतावासाकडे असतात.'

Mumbai News: मुंबईतला रिक्षाचालक खरंच महिन्याला ८ लाख रुपये कमावतो, काय आहे सत्य?
Mumbai Richest Thief : मुंबईत फ्लॅट, गावी जमीन अन् बंगला...; बँकेत लाखोंचा बॅलन्स, मुलींचे कपडे घालून चोरी, कोट्याधीश चोर जाळ्यात कसा अडकला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com