Mumbai Assembly Election 2024 Voting: वरळीमध्ये मनसे- शिंदे गटात राडा, पाठिंब्याबाबत शिंदे गटाकडून फेक पत्र व्हायरल

MNS And Shinde Group Rada In Worli: वरळीमध्ये शिंदे गटाकडून फेक पत्र वायरल करण्यात आले असल्याचा आरोप मनसे नेते आणि उमेदवार संदीप देशपांडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
Mumbai Assembly Election 2024 Voting
MNS And Shinde Group Rada In WorliSaam Tv
Published On

वैदेही काणेकर, मुंबई

Maharashtra Vidhan Sabha Election: वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि मनसेमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. वरळीमध्ये शिंदे गटाविरोधात मनसेने पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून फेक पत्र वायरल करण्यात आले असल्याचा आरोप मनसे नेते आणि उमेदवार संदीप देशपांडे यांनी केला आहे. पत्रामध्ये राज ठाकरे यांच्या सहीसोबत मनसेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या फेक पत्राची संदीप देशपांडे यांनी केली आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा असे फेकपत्र वरळीमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वरळीमध्ये वाटप केल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात जाब विचारला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे सध्या वरळीमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Mumbai Assembly Election 2024 Voting
Maharashtra Political News : बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा मतदानाआधीच भाजपमध्ये प्रवेश

या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाणे आणि वरळी येथील पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संदीप देशपांडे सध्या वरळी पोलिस ठाण्यामध्ये आहेत. या घटनेमुळे सध्या वरळी मतदारसंघामध्ये तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Mumbai Assembly Election 2024 Voting
Maharashtra Politics : पैसे देणाऱ्याला अन् घेणाऱ्याला बेड्या ठोकल्या, मध्यरात्री संभाजीनगरचं वातावरण तापलं; ठाकरेसेना अन् शिंदेसेना आमनेसामने!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com