Mumbai Airport : ‘विस्तारा’, ‘इंडिगो’च्या विमानांना लेटमार्क; पीक अवरमध्ये उड्डाने कमी करूनही १ तास विलंब

Indigo Airlines : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई विमानतळावर पीक अवरमध्ये विमानांची वाहतूक कमी करूनही विमान वाहतुकीची लेटमार्कमधून सुटका झालेली नाही. याचा ‘विस्तारा’ आणि ‘इंडिगो’च्या विमानप्रवाशांना शनिवारी अर्धा ते एक तास विलंबाचा फटका बसला.
Mumbai Airport
Mumbai AirportSaam Digital
Published On

Mumbai Airport

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई विमानतळावर पीक अवरमध्ये विमानांची वाहतूक कमी करूनही विमान वाहतुकीची लेटमार्कमधून सुटका झालेली नाही. याचा ‘विस्तारा’ आणि ‘इंडिगो’च्या विमानप्रवाशांना शनिवारी अर्धा ते एक तास विलंबाचा फटका बसला. दिल्लीवरून शनिवारी मुंबईला येणाऱ्या विस्ताराच्या विमानाला २० ते ४० मिनिटे उशीर झाला, तर इंडिगोचे मुंबई ते कोलकत्ता विमान सकाळी एक तास उशिराने उतरले. विमानाचा वक्तशीरपणा सुधारावा, यासाठी एकीकडे गर्दीच्या वेळी संख्या कमी केली आहे; तरीही विलंब होत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोनाकाळात लागू केलेले निर्बंध हटवल्यानंतर विमानतळांवरील हवाई वाहतूक वाढली आहे. देशातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळाला याचा फटका बसत असून विमानांना धावपट्टीवर उतरायला विलंब होत आहे. त्यामुळे इंधनही वाया जात आहे. मुंबई विमानतळावरील उड्डाणांची स्थिती, गर्दी कमी करण्यासाठी आणि वक्तशीरपणा सुधारण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई विमानतळाला नियोजित विमान उड्डाणांची संख्या कमी करण्यासाठी पीक अवरमध्ये खासगी उड्डाणांची संख्या मर्यादित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विमानतळावर असलेल्या गर्दीमुळे विमान उतरण्यास विलंब झाला. यापुढे वेळ पाळण्याची काळजी घेऊ, असे इंडिगो आणि विस्ताराच्या वतीने सांगण्यात आले.

Mumbai Airport
Mumbai News : देशात पहिल्यांदा स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन थेरपीचा वापर; रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने मिळणार वेदनांपासून आराम

देशात पहिल्यांदा स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन थेरपीचा वापर

मुंबईतील डॉक्टरांनी वापरलेल्या एका उपचारपद्धतीमुळे सौदी अरेबियाच्या एका शैख निवासी रहिवाशाला त्याच्या पायाच्या दुखण्यातून आराम मिळाला आहे. तीव्र स्वरूपाच्या पोस्ट-अॅम्युटेशन पेन सिंड्रोमसाठी स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन थेरपीचा वापर करण्यात आला. ५६ वर्षीय अकाउंटन्ट खालेद अली हुसेन अल-एसायी यांना टाइप २ डायबेटिस आणि पेरिफेरल आर्टेलियल डिजिजचा त्रास होता.

Mumbai Airport
Navi Mumbai News : जहाज बुडालं..कागदपत्र हरवली; इराणमध्ये अडकलेल्या नाशिकच्या तरुणांची थरारक कहाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com