Mumbai News : देशात पहिल्यांदा स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन थेरपीचा वापर; रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने मिळणार वेदनांपासून आराम

Mumbai News Update : मुंबईतील डॉक्टरांनी वापरलेल्या अॅम्युटेशन पेन सिंड्रोमसाठी स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन थेरपी उपचारपद्धतीमुळे सौदी अरेबियाच्या एका शैख निवासी रहिवाशाला त्याच्या पायाच्या दुखण्यातून आराम मिळाला आहे.
Mumbai News
Mumbai News Saam Digital

Mumbai News

मुंबईतील डॉक्टरांनी वापरलेल्या एका उपचारपद्धतीमुळे सौदी अरेबियाच्या एका शैख निवासी रहिवाशाला त्याच्या पायाच्या दुखण्यातून आराम मिळाला आहे. तीव्र स्वरूपाच्या पोस्ट-अॅम्युटेशन पेन सिंड्रोमसाठी स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन थेरपीचा वापर करण्यात आला. ५६ वर्षीय अकाउंटन्ट खालेद अली हुसेन अल-एसायी यांना टाइप २ डायबेटिस आणि पेरिफेरल आर्टेलियल डिजिजचा त्रास होता.

ऑगस्ट २०१९ मध्ये डायबेटिसमुळे गँगरीन झालेला त्यांचा पाय गुडघ्यापर्यंत कापून टाकावा लागला होता. या शस्त्रक्रियेनंतर स्टम्प म्हणजे उर्वरित पायामध्ये जाणवणाऱ्या वेदना तसेच पायाच्या कापून टाकलेल्या भागात जाणवणाऱ्या फॅन्टम वेदना त्यांना असह्य झाल्या होत्या. त्यामुळे, त्यांनी ही उपचार पद्धती वापरणाऱ्याचा निर्णय घेतला. या उपचारपद्धतीमध्ये पाठीच्या मणक्याला सौम्य व्होल्टेजचे विद्युत उद्दीपन (इलेक्ट्रॉनिक स्टिम्युलेशन) दिले जाते, ज्यामुळे वेदनेचे संदेश पाठविले जाणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. या उपचारपद्धतीचे परिणाम थक्क करणारे होते, ज्यामुळे रुग्णाला आपल्या मूळ वेदनेपासून संपूर्ण आराम मिळाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही उपचारपद्धती अवयव काढून टाकल्यानंतर जाणवणाऱ्या पोस्ट- अॅम्प्युटेशन वेदनेच्या गुंतागुंतीच्या आणि दुर्बल करणाऱ्या स्वरूपावर उपाय करण्याची या उपचारपद्धतीची क्षमता या प्रकरणातून दिसून येते. पारंपरिक उपचारपद्धतींचे सर्व प्रकारचे पर्याय वापरून झालेल्या रुग्णांसाठी ही एक आशादायी बाब आहे, असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने डॉ. प्रीती दोशी यांनी सांगितले.

Mumbai News
Navi Mumbai News : जहाज बुडालं..कागदपत्र हरवली; इराणमध्ये अडकलेल्या नाशिकच्या तरुणांची थरारक कहाणी

रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने मिळणार आराम

रुग्णाला आराम मिळावा म्हणून रुग्णाच्या पायात विद्युत तरंग देणारे दोन डिवाइस प्रत्यारोपण केले गेले. या डिवाइसचा कंट्रोल रिमोटमध्ये शिफ्ट करण्यात आला आहे. त्यामुळे, जर रुग्णाला पुन्हा दुखू लागले तर त्याची तीव्रता रिमोट नुसार कंट्रोल करता येईल. रुग्ण खालिद अली यांनी डॉक्टरांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत. आता मी वेदना विरहित आयुष्य जगू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

Mumbai News
Uddhav Thackeray: EVM घोटाळा कराल तर असंतोषाचा धडका उडेल; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com