Navi Mumbai News : जहाज बुडालं..कागदपत्र हरवली; इराणमध्ये अडकलेल्या नाशिकच्या तरुणांची थरारक कहाणी

Marine Jobs : इराणमध्ये जहाजावर नोकरीसाठी गेलेले नाशिकमधील दोन तरुण कुवेतच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातून सुदैवाने बचावले होते. मात्र त्यांच्याकडील पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे हरवल्यामुळे तेथील तरुंगात ते अडकून पडले होते.
Navi Mumbai News
Navi Mumbai NewsSaam Digital
Published On

Navi Mumbai News

इराणमध्ये जहाजावर नोकरीसाठी गेलेले नाशिकमधील दोन तरुण कुवेतच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातून सुदैवाने बचावले होते. मात्र त्यांच्याकडील पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे हरवल्यामुळे तेथील तरुंगात ते अडकून पडले होते. नवी मुंबईतील ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनने केलेल्या पाठपुराव्यामुळे या दोन तरुणांची सुटका झाली आहे. नुकताच हे दोन्ही तरुण मुंबईत सुरखरुप परतले आहेत.

अविष्कार जगताप व निवृत्ती बागूल अशी सुटका झालेल्या तरुणांची नावे असून हे दोघेही नाशिक येथे राहणारे आहेत. या दोघांना डिसेंबर 2023 मध्ये एक एजंटने इराण देशात नोकरीसाठी पाठवले होते. इरामधील जहाजावर काम करत असताना 19 जानेवारी रोजी कुवेतच्या समुद्र किनाऱ्यावर जहाज बुडाले होते. त्यावेळी जहाजावरील सर्वजण बुडाले मात्र अविष्कार आणि निवृत्ती हे दोघे बोटीतून सुखरुप किनाऱ्यावर पोहोचले होते. त्यानंतर कुवेतमधील पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र जहाज बुडाल्यामुळे अविष्कार व निवृत्ती या दोघांचे पासपोर्ट व इतर कागदपत्रे हरविल्याने त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही बाब अविष्कार व निवृत्ती यांच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी या दोघांना सोडविण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले होते. या दोघांच्या कुटुंबियांना ऑल इंडिया सिफेरर्स यूनियन बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी युनीयनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संपर्क साधून अविष्कार व निवृत्ती या दोघांना सोडविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर युनियनने कुवेतमधील भारतीय भारतीय दुतावास व परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे पाठपुरवा केला. त्यामुळे भारतीय दुतावासाने या दोन्ही तरुणांना तुरुंगातून बाहेर काढून त्यांना भारतात पाठवून दिलें. शुक्रवारी 1 मार्च रोजी हे दोन्ही तरुण मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम नवी मुंबईत येऊन सिफेरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Navi Mumbai News
Prakash Ambedkar : माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं PM नरेंद्र मोदींना खुलं आव्हान

परदेशात नोकरीसाठी पाठवण्यात सक्रीय असलेले काही बोगस एजंट नोकरीची गरज असलेल्या तरुणांना इराण, मलेशिया, दुबई, सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये पाठवतात. या बोगस दलालांच्या माध्यमातून जहाजावर गेलेल्या तरुणांची कागदपत्रे काढून घेतली जातात. त्यामुळे अनेक तरुण तेथे अडकतात. अशा प्रकारे तरुणांना गुलामगीरीत ढकलणाऱ्या दलालांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सिफेरर्स यूनियनने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

Navi Mumbai News
Samruddhi Mahamarg : मुंबईतून शिर्डीला अवघ्या 1 तासात पोहचता येणार; उद्या होणार समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com