Uddhav Thackeray: EVM घोटाळा कराल तर असंतोषाचा भडका उडेल; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Mumbai News: कपिल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज आज समाजवादी गणराज्य पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एनडीएसोबत गेलेल्या नितीश कुमार यांच्यासह भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
PM Modi, Uddhav Thackeray
PM Modi, Uddhav Thackeraysaam tv
Published On

रुपाली बडवे, मुंबई|ता. ३ मार्च २०२४

Uddhav Thackeray Speech:

जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आणि विधान परिषद आमदार कपिल पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज आज समाजवादी गणराज्य पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली. धाराशीवमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एनडीएसोबत गेलेल्या नितीश कुमार यांच्यासह भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"समाजवादी आणि हिंदुत्ववादी एकाच मंचावर कसे ? यावरुन अनेकांना आश्चर्य वाटत असेल. देशाला लढवय्यांची गरज असताना तुम्ही पक्ष काढला. माजवादी विरुद्ध समाजवादी अशी ही लढाई आहे. नितीश कुमार आणि अशोक चव्हाण हे एवढ्या लवकर जातील, असं वाटलं नव्हत. कपिल पाटील तुमचे बिहारमध्ये अजूनही चांगले संबंध आहेत.मोदींनी सव्वा लाख कोटी रुपयांच पॅकेज बिहारला जाहीर केल होत. त्यातले किती रुपये आले ते मोदींना विचारा म्हणावं," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

"२५-३० वर्षांपासून आमची युती होती. २ वेळा आम्ही भुलथापांना बळी पडलो. आता केवळ नाव बदलली जात आहेत. त्यांच्या जुमलाला आता गॅरंटी असं नाव दिले. भाजपाने काल पहिली यादी जाहीर केली. त्यात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुम्ही कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले. त्याच नाव पहिल्या यादीत आले. मात्र नितीन गडकरी यांच नाव पहिल्या यादीच नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi, Uddhav Thackeray
Cricket Stadium : बीडमध्ये राष्ट्रीय दर्जाचं 65 कोटींचे क्रिकेट स्टेडियम उभारणार; धनंजय मुंडे यांची घोषणा

"जनतेमध्ये भाजपविरोधात असंतोष आहे. शेतकरी कामगार विद्यार्थी सगळे आक्रोश करत आहेत. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न ईव्हीएम च काय होणार? ईव्हीएममध्ये घोटाळा करतील आणि ते जिंकतील, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. ईव्हीएम घोटाळा भाजपने केला तर जनतेमध्ये असंतोष भडकेल. ईव्हीएमचा घोटाळा करुन सत्तेत याल तर देशात असंतोषाचा भडका उडेल," असा थेट इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)

PM Modi, Uddhav Thackeray
Prakash Ambedkar : माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं PM नरेंद्र मोदींना खुलं आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com