Mumbai Air Pollution: फटाके फोडून मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्यांविरोधात कारवाई; तब्बल इतक्या जणांविरोधात FIR दाखल

Mumbai Air Pollution : उच्च न्यायालयाने घातलेल्या वेळेच्या बंधनानुसार त्या मर्यादांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यामध्ये दिले होते.
Mumbai Air Pollution
Mumbai Air PollutionSocial Media
Published On

Mumbai Air Pollution:

गेल्या काही दिवासांपासून मुंबईसह दिल्ली शहरत वायू प्रदूषण वाढलं आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यात दिवाळी आल्यानंतर फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी निर्बंध घातले होते. रात्री ८ ते १० या वेळेपेक्षा अधिक वेळ फटाके फोडणाऱ्यां कारवाई केली जाईल अशी ताकीद मुंबई उच्च न्यायालयाने दिली होती. (Latest News)

उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानंतर, मुंबई पोलिसांनी रात्री ८ ते १० या वेळेपेक्षा अधिक फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आलीय. यात एकूण ७८४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ज्यात ८०६ जणांवर गुन्हेगारी कारवाई करण्यात आलीय. तर ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा प्रदूषित झाली होती.

हवेची गुणवत्ता खालवत असताना महापालिकेने बांधकामांना नोटीस पाठवल्या आहेत. वाढत्या वायू प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय यांनी सुनावणीदरम्यान शहरातील वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० वाजेपर्यंत मर्यादित केली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने घातलेल्या वेळेच्या बंधनानुसार त्या मर्यादांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्यानुसार मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये व्यापक कारवाई करण्यात आलीय. फटाके फोडण्यासाठी ठरवलेल्या कालावधीचे उल्लंघन केल्याबद्दल आयपीसीच्या कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा ३३ अंतर्गत आरोप ठेवण्यात आलेत. आयपीसीच्या कलम १८८ नुसार सकाळी ६ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान फटाके फोडल्यामुळे कारवाई केली गेली. तर रात्री १० ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान फटाके फोडणाऱ्यांवर एफआयआर नोंदविला गेल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३३ अन्वये ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकाकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना सीआरपीसी कायदा ४१(ए) अंतर्गत एफआयआर आणि नोटीस देण्यात आलीय. डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान एकूण ७८४ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. तर ८०६ लोकांवर कारवाई करण्यात आलीय.

Mumbai Air Pollution
Malegaon Tiger 3: मालेगावात सलमान खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, 'टायगर ३' बघताना थिएटरमध्ये फोडले फटाके

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com