Maharashtra Day 2023 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 1 मे रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी सहसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली.
सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार), महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)
आज झालेल्या रंगीत तालमीत राज्य राखीव पोलीस बल, मुंबई सशस्त्र पोलीस बल, मुंबई दंगल नियंत्रण पथक, मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल आणि इतर दलांनी संचलनात सहभाग घेतला.
उत्कृष्ट संचलन पुरस्कार
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अनुप कुमार सिंग यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी 60 पथकाने प्रथम क्रमांक, राज्य राखीव पोलीस बल ने द्वितीय तर मुंबई सशस्त्र महिला पोलीस यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
त्याचप्रमाणे उत्कृष्ट संचलनासाठी रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर, मुंबई यांनी प्रथम तर भारत स्काऊट आणि गाईड्स मुंबई महानगरपालिका यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.