
मुंबईतील आरे कॉलनीत पतीच्या हत्येचा कट पत्नीने प्रियकरासोबत रचल्याचं उघड.
पती भरत अहिरेवर चंद्रशेखर आणि रंगा या दोघांनी मिळून हल्ला केला.
पतीला उपचार न देता घरीच ३ दिवस ठेवले गेले आणि त्याचा मृत्यू झाला.
भरतच्या मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी पत्नी राजश्रीला अटक केली; दोघे आरोपी फरार.
मुंबईतील आरे कॉलनीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रियकरासोबत मिळून बायकोनं नवऱ्याला संपवण्याचा कट रचला. प्रियकरानं प्राणघातक हल्ला केल्यामुळे प्रेयसीच्या नवऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपास करीत आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्रेमप्रकरणात पती अडचण ठरत असल्यामुळे तिनं हे कृत्य केल्याचं कबूल केलं. सध्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
राजश्री अहिरे (वय वर्ष ३५) असे आरोपी महिलेचं नाव आहे. तिचा पती भरत लक्ष्मण हा मेकअप आर्टिस्ट आहे. राजश्री ही चंद्रशेखर पडयाची या व्यक्तीच्या प्रेमात अखंड बुडाली होती. मात्र, तिच्या रिलेशनशिपमध्ये पती अडसर ठरत होता. त्यामुळे तिनं त्याच्या हत्येचा प्लान आखला.
गेल्या महिन्यात भरतला त्याच्या पत्नीच्या अफेअरबाबत माहिती मिळाली होती. भरतने याबाबत राजश्रीला विचारणा केली. नंतर चंद्रशेखरला फोन केला. त्यानं भरतला आरे कॉलनीतील परिसरात बोलावून घेतलं. भरत आणि राजश्री दोघेही चंद्रशेखरला भेटण्यासाठी गेले. यावेळी चंद्रशेखरने त्याच्यावर हल्ला चढवला. चंद्रशेखरनं भरतच्या छातीवर, पोटावर आणी शरीराच्या इतर भागांवर ठोसे मारण्यास सुरूवात केली.
त्याच्यासोबत रंगा नावाचा व्यक्तीही उपस्थित होता. चंद्रशेखर जेव्हा भरतला मारहाण करीत होता. तेव्हा रंगाने त्याचे मागून हात धरले होते. राजश्रीसमोर हा सर्व प्रकार सुरू होता. मात्र, तरीही तिनं यात हस्तक्षेप घेतलेला नाही. या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपी फरार झाले. पतीला रूग्णालयात नेण्याऐवजी तिनं त्याला घरी नेले.
तीन दिवस उपचाराशिवाय घरातच ठेवले. प्रकृती खालावल्यानं त्याच्या २ मुलांना वडिलांची बिघडत चाललेली तब्येत बघवली नाही. त्यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी भरतला मालाड पूर्वेकडील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भरतच्या मुलीनं दिलेल्या जबाबामुळे हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी सखोल चौकशी करत आरोपी महिलेला अटक केली असून, इतर २ फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.