Mumbai : मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता संपली! महत्त्वाच्या ७ धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

Mumbai Water Storage मुंबईच्या सातही प्रमुख तलावांमध्ये 13,78,143 दशलक्ष लिटर पाणीसाठा असून जलसाठा 95.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. विहार आणि मोडक सागर 100 टक्के भरले आहेत.
Mumbai Water Stock Reaches 93.80 Percent | Seven Lakes Update
Mumbai Water Stock Reaches 93.80 Percent | Seven Lakes UpdateAI Image
Published On
Summary
  • मुंबईच्या सातही प्रमुख तलावांमध्ये 95.22 टक्के पाणीसाठा

  • विहार आणि मोडक सागर तलाव 100 टक्के भरले

  • 2024 मधील 94.97 टक्क्यांच्या तुलनेत यंदाचा जलसाठा अधिक

  • अप्पर वैतरणा परिसरात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 45 मिमी पाऊस

मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. रविवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार, सातही तलावांमध्ये एकूण 13,78,143 दशलक्ष लिटर पाणीसाठा असून, हा त्यांच्या एकूण उपयुक्त साठवण क्षमतेच्या 95.22 टक्के इतका आहे.

मात्र, गतवर्षी याच कालावधीत तलावांमध्ये 13,85,750 दशलक्ष लिटर, म्हणजेच 95.74 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी आहे. 2024 च्या तुलनेत मात्र यंदाची स्थिती चांगली असून, त्या वर्षी याच कालावधीत 94.97 टक्के साठा उपलब्ध होता.

Mumbai Water Stock Reaches 93.80 Percent | Seven Lakes Update
Sukanya Samruddhi Yojana : रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या स्पेशल गिफ्ट, सरकारच्या 'या' योजनेना होईल आर्थिक फायदा

सात तलावांपैकी विहार आणि मोडक सागर तलाव 100 टक्के भरलेले आहेत. तुळशी तलावात 99.35 टक्के, तानसा 99.34 टक्के, मध्य वैतरणा 95.29 टक्के आणि भातसा तलावात 95.14 टक्के पाणीसाठा आहे. तर अप्पर वैतरणा तलाव 89.32 टक्के भरलेला असून, सातही तलावांमध्ये तो सर्वात कमी भरलेला तलाव ठरला आहे.

Mumbai Water Stock Reaches 93.80 Percent | Seven Lakes Update
EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

सध्या अप्पर वैतरणामध्ये 2,02,796 दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये 1,28,925, तानसामध्ये 1,44,122, मध्य वैतरणामध्ये 1,84,414, भातसामध्ये 6,82,194, विहारमध्ये 27,698 आणि तुळशीमध्ये 7,994 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत तलावांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.

Mumbai Water Stock Reaches 93.80 Percent | Seven Lakes Update
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

अप्पर वैतरणा परिसरात सर्वाधिक 45 मिमी पाऊस झाला. मोडक सागर येथे 20 मिमी, मध्य वैतरणा 16 मिमी, तुळशी 22 मिमी, तानसा 14 मिमी, भातसा 19 मिमी आणि विहार येथे 9 मिमी पावसाची नोंद झाली. जलसाठ्याच्या स्थितीमुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याला सध्या मोठा आधार मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com