Alisha Khedekar
यंदा बहिणीला नेहमीची भेट न देता तिच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षिततेची भेट द्या. सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या शिक्षण आणि भविष्यातील गरजांसाठी उपयुक्त ठरू शकते.
भारतीय मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने खाते उघडता येते. एका मुलीच्या नावावर फक्त एकच खाते ठेवता येते, अशी योजनेची अट आहे.
या खात्यात वर्षाला किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये जमा करता येतात. खाते उघडल्यानंतर 15 वर्षांपर्यंत पैसे भरता येतात, त्यामुळे नियोजन सोपे होते.
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 8.2 टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे. व्याजाची गणना मासिक होते आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते.
सुकन्या समृद्धी खाते पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते. जन्मदाखला, आधार, फोटो आणि पॅन किंवा लागू असल्यास फॉर्म 60 आवश्यक असतो.
या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत करसवलत मिळते. त्यामुळे रक्षाबंधनाला बहिणीच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजनाची ही भेट नक्कीच विचारात घेता येईल.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा