Sindhutai Sapkal: हजारो अनाथांची माय काळाच्या पडद्याआड गेली - किशोरी पेडणेकर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, हजारो अनाथ मुला-मुलींची आई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित निधनाने हजारो अनाथांची माय काळाच्या पडद्याआड गेली आहे.
Sindhutai Sapkal and Mumbai Mayor Kishori Pednekar
Sindhutai Sapkal and Mumbai Mayor Kishori PednekarSaam Tv

मुंबई - सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा (Wardha) येथे झाला होता. माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूताईचं जीवन अत्यंत खडतर होतं. (Kishori Pednekar Pays Tribute Sindhutai Sapkal)

हे देखील पहा -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी देखील सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विट करत त्यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या म्हणाल्या की, हजारो अनाथांची माय हरपली! सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांची श्रद्धांजली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, हजारो अनाथ मुला-मुलींची आई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित निधनाने हजारो अनाथांची माय काळाच्या पडद्याआड गेली आहे. हजारो अनाथांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले असून ती पुन्हा अनाथ झाली आहेत, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com