मुंबई : भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसंबंधीत ट्विट केली होती. या ट्विटमध्ये आपण लवकरच पत्रकारपरिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं होतं.
अशातच आज पुन्हा कंबोज यांनी आज आणखी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असं ट्विट (Tweet) त्यांनी केलंय. त्यामुळे आज नक्की कोणत्या नेत्यावरती कारवाई होणार आहे की आणखी कोणत्या बड्या नेताचा घोटाळा ते उघड करणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. (Monsoon Session of the Legislative Assembly)
एकीकडे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर (NCP) दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.
राज्य सरकार हे ज्या महाशक्तीच्या जोरावर सत्तेत आले त्या महाशक्तीकडे ईडी ची शक्ती असून आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ते सर्रासपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर करतात अशा टीका काँग्रेस, राष्ट्रावदी आणि शिवसेनेकडून भाजपवर वारंवार केल्या जात आहेत. तर भाजपमध्ये गेल्यावर घोटाळे करणाऱ्या मंत्र्याची चौकशी देखील थांबविण्यात येते. त्यांना शुद्ध करण्यात येतं असा आरोपही भाजपवरती करण्यात येतो.
अशातच आता मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमुळे भाजपकडून पुन्हा एकदा दबाव तंत्र सुरु झालं आहे का? असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे कंबोज यांच्या ट्विटवर राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी एक ट्विट केलं आहे यामध्ये त्यांनी मोहित कंबोज यांना आव्हान दिलं आहे.
आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे, यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देताय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो. तुमची सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही, आ देखे ज़रा किसमें कितना है दम असं ट्वीट करत चव्हाण यांनी कंबोज यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे.
काल कंबोज यांनी केलेली ट्विट -
कंबोज यांनी काल एकूण तीन ट्विट केली.
पहिलं ट्विटमध्ये त्यांनी 'हे ट्विट सेव्ह करून ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटणार आहे. असं म्हटलं आहे.
दुसरं ट्विट -
मी लवकरच पत्रकारपरिषद घेणार असून त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करेल, संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील बेनामी संपत्ती, कंपन्या, तसेच नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्तीची यादी जाहीर करणार असल्याचा इशारा त्यांनी या ट्विटमध्ये दिला.
तिसरं ट्विट -
सलग दोन ट्विट केल्यानंतर मोहित कंबोज यांनी तिसरं ट्विट देखील केलं. या ट्विटमध्ये त्यांनी परमबीर सिंग यांनी २०१९ मध्ये बंद केलेली सिंचन घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे कंबोज यांनी ही मागणी केली आहे. तर आज त्यांनी 'हर हर महादेव! अब तांडव होगा!' अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.