
मुंबईनंतर आता नवी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजप आमदाराकडून सीवूड्समध्ये पुन्हा गुजराती पाटी लावण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आक्रमक झाला आहे. मनसेचे नेते या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सीवूड्स सेक्टर-४२ मधील शेल्टर आर्केड इमारतीत भाजपचे गुजरातमधील आमदार वीरेंद्रसिंग जाडेजा यांनी स्थापन केलेल्या जनसंपर्क कार्यालयावर पुन्हा एकदा गुजराती पाटी झळकली आहे. यापूर्वी मराठी जनतेच्या विरोधामुळे पाटी मराठीत बदलण्यात आली होती. मात्र आता मराठी फक्त सूक्ष्म अक्षरांत तर मुख्य पाटी पुन्हा गुजरातीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत मनसे आक्रमक झाली आहे.
'हा सरळसरळ मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे.', असा आरोप मनसेने केला आहे. यासंदर्भात मनसे एन आर आय पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करणार आहे . यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचा आवाहन देखील मनसेने यावेळी केले आहे. यामुळे आता नवी मुंबईत मराठी- गुजराती वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी गुजराती समाजातील लोक मराठी कुटुंबांना त्रास देत असल्याची घटना समोर आली होती. घाटकोपरच्या राजगड चौकात एका इमारतीमध्ये ही घटना घडली होती. कुत्रा पाळण्यावरून हा वाद झाला होता. या वादातून मराठी कुटुंबाला घरात घुसून मारहाण करण्यात आली होती. याचा सीसीटीव्हीसमोर आला होता.
त्यानंतर घाटकोपरमध्येच आणखी एका इमारतीमध्ये राहणाऱ्या गुजराती भाषिकांनी मराठी माणसांना हिणवलं होतं. 'मराठी लोग गंदे होते है| वो मच्छी खाते है|', असे बोलल्यामुळे वाद चांगलाच पेटला होता. या गुजराती नागरिकांनी इमारतीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मराठी कुटुंबांना बोलावायचे नाही असे देखील सांगितले होते. त्यानंतर मनसे नेत्यांनी त्या इमारतीमध्ये जाऊन गुजराती नागरिकांना मनसे स्टाईलमध्ये धडा शिकवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.