'मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा; मनसेकडून कल्याण डोंबिवलीत रिक्षांवर स्टिकर मोहीम

kalyan news : मनसेने रिक्षांवर स्टिकर मोहीम सुरु केली आहे. कल्याण डोंबिवलीत मनसैनिकांकडून रिक्षांवर स्टिकर लावले जात आहेत.
kalyan news update
kalyan news Saam tv
Published On
Summary

मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

कल्याण-डोंबिवलीत मराठी सक्तीसाठी मनसे आक्रमक

मनसैनिकांकडून रिक्षांवर स्टिकर लावण्याची मोहीम

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

'मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते. माझ्या रिक्षात बसा, अशा आशयाचे स्टिकर शहरातील रिक्षांवर लावण्याची मोहीम मनसे पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्वत:च्या शैलीत उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही स्टिकर मोहीम राबवली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील अनेक रिक्षांवर हे स्टिकर लावण्यात आले असून सर्व रिक्षाचालकांनी स्वेच्छेने हे स्टिकर लावावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

kalyan news update
Marathi compulsory: 'आमच्या भाषेच्या विरोधात रस्त्यावर येत असाल, तर…'; अमराठी रिक्षाचालकांवर संतापला आणखी एक मराठी अभिनेता

विशेष म्हणजे, या मोहिमेला परप्रांतीय रिक्षाचालकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक चालकांनी मराठी भाषा समजून घेण्याची आणि बोलण्याची तयारी दर्शवत स्टिकर लावले आहेत. यावेळी रिक्षाचालकांना मराठी बोलण्याचे आवाहनही करण्यात आले.मनसे पदाधिकारी आरिफ शेख आणि योगेश पाटील यांनी यावेळी मराठी भाषेचा सन्मान राखण्याची गरज अधोरेखित केली.

रिक्षाचालक शफिउल्लाह यांनीही मराठी शिकण्याची आणि ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्याची तयारी व्यक्त केली. या मोहिमेमुळे कल्याण-डोंबिवलीत मराठी भाषा आणि स्थानिक प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

kalyan news update
मराठीच्या मुद्द्यावर शिंदे गटात फूट, निरुपम मराठीद्वेष्ट्या भय्यांच्या पाठीशी, संतापलेल्या मनसैनिकांची निरुपमांच्या गाडीवर दगडफेक

संदीप देशपांडे काय म्हणाले?

तत्पूर्वी, मराठी सक्तीच्या मुद्यावर संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं. 'शिवसेना पक्षाचा एक माणूस मराठीची सक्ती करू नका, यासाठी बैठका घेत असेल. तर मनसे म्हणून आम्ही विरोध करणारच. माझ्या मते गुन्हे जे दाखल केले, त्यात आम्ही कोर्टात पाहू. कायदेशीर लढाईला आम्ही घाबरत नाही. आम्ही अस्वल आहोत केस आला काय, केस गेला काय... महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या आम्ही तडजोड करणार नाही. आम्ही मागणी केली की, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. संजय निरुपम यांना घरी बसवा, तरच कायदा सुव्यवस्था राहील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com