अभिजीत देशमुख, कल्याण|ता. १४ फेब्रुवारी २०२४
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना सरकार दरबारी मात्र त्यांच्या मागण्यांबाबत शांतता पाहायला मिळत आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राजू पाटील?
"मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या तब्येतीवरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. 'मनोज जरांगेंची तब्येत ढासळत चालली आहे, अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. कोण चुक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये," असे ट्वीट आमदार राजू पाटील यांनी केले आहे.
आज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली.
आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांना बोलताही येत नाहीये. डॉक्टरांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र बंदची हाक!
दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला बीड, लातूर जिल्ह्यामध्ये १०० टक्के प्रतिसाद पाहायला मिळत आहे. बीड शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली बाजारपेठेमधील दुकाने बंद ठेवली आहेत. तसेच नांदेड शहर आणि अनेक तालुक्यात सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.