Dharashiv News: भरधाव टँकरने दोन शाळकरी विद्यार्थिनींना चिरडलं; सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील घटना

Dharashiv Accident News: भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाच्या टँकरने शाळकरी विद्यार्थिनींना जोरदार धडक दिली. या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाली आहे.
Dharashiv Accident News
Dharashiv Accident NewsSaam TV
Published On

भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाच्या टँकरने शाळकरी विद्यार्थिनींना जोरदार धडक दिली. या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाली आहे. थरकाप उडवणारी ही घटना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा तालुक्यातील येणेगुरजवळ घडली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dharashiv Accident News
Pune Crime News: फेसबुकवर ओळख, निर्जनस्थळी बोलावत तरुणाला लुटले; जबरी चोरी करणारी टोळी गजाआड

श्रेया सुरेश पाञे असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून श्रद्धा श्रीकांत कांबळे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थिनी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असून बुधवारी सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. (Latest Marathi News)

याचवेळी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा तालुक्यातील येणेगुरजवळ भरधाव वेगात आलेल्या दुधाच्या टँकरने त्यांना जोरदार धडक (Accident News) दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये श्रेयाचा जागीच मृत्यू झाला. तर श्रद्धा गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत थेट रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं. रस्ता खराब असल्याने असे भयंकर अपघात होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

रस्ता दुरुस्तीबाबत ठोस आश्वासन देण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून याप्रकरणी पोलिसांकडून टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Dharashiv Accident News
Shocking News: खळबळजनक! भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या, विनयभंगाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com