आज बाळासाहेब नाहीयेत ते बरं आहे; राज ठाकरे असे का म्हणाले? VIDEO

raj thackeray news : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकत्र आले. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
MNS Raj Thackeray
Raj thackeraySaam tv
Published On

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकत्र आले. जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आज बाळासाहेब ठाकरे नसल्याचं चांगलं वाटतंय, असं म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. ते मुंबईत बोलत होते.

राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

निवडणुकीच्या आधी उद्धव आजारी होते. त्यानंतर मी ताणून धरलं होतं. मग मला सर्दी खोकला ताप सुरू झाला. अजून सुरूच आहे. फार बोलता येणार नाही. शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेलेत. माझे फॅमिली डॉक्टर आहेत यादव, मराठी हा.... त्यांच्याकडून औषधं घेतली. उद्धवना दिली. दोन दिवसांत बरे झाले. मी औषधं घेतो पण सहा दिवस झाले...अजून काही नाही. मी म्हटलं डॉ़क्टरनं पक्ष बदलला की काय...

माननीय बाळासाहेबांचा जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. मी आज सामनामध्ये लेख आला आहे. अनेक आठवणी लिहिल्या आहेत. खरं तर त्या व्यक्तीला कसं पाहायचं असा अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका, व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणून, की त्यांच्यावर बोलायचं म्हटलं तर मी आणि उद्धव तुमच्याशी तासनतास बोलू शकतो. खूप किस्से आहेत ते सांगताही येणार नाही. न सांगण्याचं कारण म्हणजे भाषा...

ते काय होतं ते माहीत नाही तुम्हाला.... लहानपणापासून अनेक गोष्टी बघितल्या. त्यांना पाहत आलो. वादळं, दंगली, राडे, आंदोलने, जेल कधी काय...कधी काय...बाहेर असं सगळं वातावरण असताना हा माणूस जेव्हा व्यंगचित्र काढायला बसायचा त्यावेळी त्यात अनेक बारकाईने गोष्टी बघितल्या. त्यात कधीही मारकाम दिसलं नाही.

MNS Raj Thackeray
'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं; कर्मचाऱ्यानेच पेट्रोलने टाकून जाळलं अन् रचला अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण समोर

मला असं वाटतं की कित्येकदा विचार करतो पण अशक्य आहे. ती जी समाधी लागते ना.... ती व्यंगचित्रे नव्हती, तर ती त्या माणसाची समाधी होती...तल्लीन होणं म्हणतो ना ...ते...त्यातला विनोद कधीही हलला नाही. तेंडुलकरांचं एक पुस्तक आहे. शीर्षक आहे. हे सारं येतं कुठून....ज्या वेळेला बाळासाहेब म्हणून विचार करायला लागतो तेव्हा विचार करतो की ते येतं कुठून, आलं कुठून... म्हणून या देशामधल्या सगळ्या राजकारण्यांपेक्षा वेगळा माणूस होता त्याचं कारण ते होतं.

एक आर्टिस्ट कलाकार कलाकृती सादर करतो, आकार देतो. कोणताही चित्रकार, शिल्पकार, व्यंगचित्रकार झाला नाही. की स्वतःच्या बाबतीत काही घडतं आणि तो कलाकृती सादर करतो. आजची राजकारणाची परिस्थिती पाहिली की ...आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, गुलामांचा बाजार...हे चित्र बघितल्यानंतर कुठेही जा...आज मला वाटतं की बाळासाहेब नाहीत ते बरं....

तो माणूस किती व्यथित झाला असता. त्या माणसाला काय त्रास झाला असता. हे सगळं चित्र आज महाराष्ट्रात दिसतं समोर...जसे ते पूर्वी...२०० वर्षांपूर्वी चावडीवर माणसांचे लिलाव लागायचे .तसे माणसांचे लिलाव महाराष्ट्रात सुरू आहे. कल्याण डोंबिवली, इतर ठिकाणी...हे बघून शिसारी आली....

MNS Raj Thackeray
मोठी बातमी! भाजपनंतर शिंदे गटाने उधळलला विजयाचा गुलाल, पहिला उमेदवार बिनविरोध

व्यथित व्हायला होतं. काय चालू आहे कुठे नेतोय आपण....ही परिस्थिती बघायला बाळासाहेब नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. हा माणूस हे बघूच शकला नसता. ज्या गोष्टी शून्यातून उभ्या केल्या. बाकिच्या पक्षांत बघा...अनेक लोक दिसतील ते बाळासाहेबूांनीच तयार केले होते. ज्या गोष्टी घडत जातात, ज्या घडत गेल्या, मी ज्यावेळी बाहेर पडतो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं. घर सोडणं होतं.... पण त्या सगळ्या गोष्टींना २० वर्षांचा काळ निघून गेलाय. उद्धवना, मला उमगल्यात त्या गोष्टी...द्या सोडून आता....

MNS Raj Thackeray
मुंबईतील लोकल ट्रेनची गर्दी २ महिन्यात कमी होणार; रेल्वे प्रशासनाने दिली महत्वपूर्ण माहिती

बाळासाहेबांचे सगळे पैलू मला मांडायचे आहे. बाळासाहेब प्रत्येकाला वाटलं की हा माणूस असा आहे...तो माणूस कसा होता जगाला कळलाच नाही. आम्ही घऱातले तरी आम्हाला कळलाच नाही. होतं ते विलक्षण होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com