Maharashtra Politics: शिंदेसेनेत मध्यरात्री खलबतं! भाजपविरोधात रणनीती, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश

Pune MLC Election 2026: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडली. या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी मध्यरात्री बैठक पार पडली.
Maharashtra Politics: शिंदेसेनेत मध्यरात्री खलबतं! भाजपविरोधात रणनीती, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश
Pune MLC Election 2026Saam Tv
Published On: 
  • पुणे शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोडी

  • एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मध्यरात्री बैठक

  • पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकनाथ शिंदेंची रणनीती

  • सचिन सानप यांना शिंदेसेनेचा पाठिंबा मिळणार

  • कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिंदेसेनेची भूमिका

सचिन जाधव, पुणे

विधान परिषद निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी विधान परिषद निवडणुकीबाबत मध्यरात्रीपर्यंत खलबतं झाली. या बैठकीत भाजपचे पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात उभे ठाकलेले बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन सानप उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने सचिन सानप यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली. या बैठकीमध्ये सचिन सानप यांच्या विजयाची रणनीती ठरल्याची आणि त्यासाठी तयारी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन येथे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक पार पडली. नाशिक पॅटर्ननुसार पुणे शिक्षक मतदारसंघात सचिन सानप यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. प्राध्यापक असलेले सचिन सानप अनेक वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न मांडत आहेत आणि ते उदय सामंत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: शिंदेसेनेत मध्यरात्री खलबतं! भाजपविरोधात रणनीती, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश
Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना सचिन सानप यांना पाठिंबा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र अधिकृत पाठिंब्याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. या बैठकीला उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, भावना गवळी, ओमराजे निंबाळकर, विजय शिवतारे, शहाजीबापू पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Maharashtra Politics: शिंदेसेनेत मध्यरात्री खलबतं! भाजपविरोधात रणनीती, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश
Maharashtra Politics: मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

या बैठकीत पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका आणि निवडणूक लढवण्याच्या रणनीतीवर चर्चा बराच वेळ चर्चा झाली. रवींद्र धंगेकर यांनी ही माहिती दिली. पक्षाची निवडणूकविषयक भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली. नाराजीचा विषय नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेना कोणाला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: शिंदेसेनेत मध्यरात्री खलबतं! भाजपविरोधात रणनीती, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश
Maharashtra Politics: ठाकरेसेनेतून शिंदे गटात गेले, आता जाहीर नाराजी बोलून दाखवली; शिंदे संतापून म्हणाले, विचार करावा लागेल!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com