दिवा - दिव्यात आज भाजपने (BJP) वॉटर, मीटर, गटर आंदोलन केले. या आंदोलनात भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सत्ताधारी शिवसेनेचा (Shivsena) हंडा फोडून भाजपने निषेध केला. शिवसेनेची सत्ता असून दिव्यात 8 नगरसेवक सुध्दा साधे पाणी देऊ शकले नाहीत असे भाजप आमदार केळकर यांनी सांगितले. तसेच नवाब मलिक (Nawab Malik) यांचा नकाब उतरला आहे असेही व्यक्तव्य त्यांनी केले आहे.
हे देखील पहा -
भाजप आमदार संजय केळकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देत सांगितले की, शासकीय यंत्रणेने सर्व पुरावे गोळा करुन त्यांना अटक केली आहे. नवाब यांचा नकाब तर उतरला आहे. आता कोर्टाच्या विरोधात आंदोलन करायचे बाकी राहीलेले आहे. तुम्ही कोर्टालाही मानत नाही, तुम्ही घटनेला मानत नाही, कायद्याला नियमाला मानत नाही आणि त्याच्या विरोधातच आपले छाती बडवून भाजपा विरोधात आवाज उठवितात जर तुम्ही निर्दोश असाल तर कायद्याची लढाई लढून तुम्ही निर्दोश सुटू शकता.
पण हे अतिशय वेदना दायक आहे की, या मुंबईत २५४ निरपराध नागरीक ज्या बॉंम्बस्फोटामुळे मारले गेले त्यांचे निधन झाले. यात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांच्याशी यांचे हितसंबंध आहेत, असाही आरोप त्यांच्यावर ठेवलेला आहे. अशा प्रकारचे काम करणाऱ्यांची जागा ही जेलच असली पाहीजे असे देखील ते यावेळी म्हणाले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.